Team My pune city – हीरक महोत्सवात पदार्पण करीत असलेल्या( Purushottam Karandak) महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अर्जांची स्वीकृती रविवार, दि. 3 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असून स्पर्धेचे लॉटस् सोमवार, दि. 4 ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहेत.
अर्जांची स्वीकृती सायंकाळी 5 ते 9 या वेळात 418, नातू वाडा, शनिवार पेठ येथे होणार आहे. ज्या संघांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज घेतले आहेत त्या संघांपैकी कुणी अर्ज स्वीकृतीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास स्पर्धेसाठी इतर संघांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार( Purushottam Karandak) आहे.
Vadgaon Maval News : वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी
दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे स्पर्धकांच्या उपस्थितीत स्पर्धेचे लॉटस् काढण्यात येणार( Purushottam Karandak) आहेत.