Team My Pune City – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ( PCMC)लेखा विभागातील भ्रष्टाचाराचे चित्र पुन्हा एकदा जनतेसमोर उघड झाले आहे. लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर करदाता नागरिक राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना एक निवेदन सादर करत सदर व्हिडिओची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Kanbai Mata Utsav : पिंपरी चिंचवड मध्ये आई कानबाई माता उत्सवाला उद्यापासून सुरूवात
कोल्हटकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, सदर व्हिडिओमधून लेखा विभागात भ्रष्टाचार खुलेआम कसा चालतो हे जनतेसमोर आले आहे. संबंधित कर्मचारी हा व्हिडिओमध्ये सरळपणे पैसे घेताना दिसून येत असूनही दोन दिवसांनंतरही विभागप्रमुख किंवा अन्य कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. ही बाब अत्यंत धक्कादायक असून, महानगरपालिकेच्या पारदर्शक प्रशासनाच्या दाव्याला फोल ठरणारी आहे.
Vadgaon Maval News : वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी
निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, लेखा विभागात अनेक कर्मचारी पदोन्नतीनंतरही अनेक वर्षांपासून एकाच पदावर, एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यामुळेच त्यांचे स्थानिक ठेकेदारांशी आर्थिक हितसंबंध तयार झाले असून, कोणतेही बिल ( PCMC)पैसे घेतल्याशिवाय पास केले जात नाही. या विभागातील शिपाई, लिपिक, अधिकारी तसेच महिला कर्मचारीसुद्धा या आर्थिक देवाणघेवाणीत सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शासनाच्या नियमानुसार कोणताही कर्मचारी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात काम करू शकत नाही, असे असतानाही लेखा विभागात हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे कोल्हटकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. काही कर्मचाऱ्यांना बदली करून पुन्हा त्याच जागेवर नियुक्त करण्यात आले असून, यामुळे त्यांच्या मनमानी कारभाराला उत आला ( PCMC)आहे.
या निवेदनाच्या माध्यमातून कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लेखा विभागातील वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची त्वरीत बदली करण्याचे आणि व्हायरल व्हिडिओची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली ( PCMC) आहे.