Team My pune city – खान्देश वासियांची ग्रामदेवता आई कानबाई माता उत्सव( Kanbai Mata Utsav) २ ते ४ ऑगस्ट रोजी मोठ्या थाटात व भक्ती भावाने पीएमआरडी मैदान चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी येथे साजरा होणार आहे. रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती उत्सव समितीचे सदस्य रवींद्र कुवर व गणेश जाधव यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील समस्त खान्देश बांधव सार्वजनिक आई कानबाई माता उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेमहोत्सवाची सुरुवात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता गहू दळणे (सप्त पूजन) कार्यक्रमाने केली जाणार असून ( Kanbai Mata Utsav) हा कार्यक्रम पीएमआरडीए मैदान वाल्हेकरवाडी पोलीस चौकी समोर घेण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
Vadgaon Maval News : वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी
३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता गणपती मंदिर शिवनगरी ते पीएमआरडीए मैदान चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी दरम्यान आई कानबाई मातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता देवींची स्थापना पीएमआरडीए येथील भव्य मंडपामध्ये केली जाणार असून( Kanbai Mata Utsav)
मान्यवरांचा सन्मान व त्यानंतर मातेचे दर्शन आणि आई कानबाई मातेच्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी प्रसिद्ध गायक आबा चौधरी व धिरज चौधरी (शिरपूर) व संपूर्ण टीम मातेचा जागर करणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जाणार आहे.
४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता आई कानबाई मातेची ( Kanbai Mata Utsav) पीएमआरडी मैदान वाल्हेकरवाडी ते जाधव घाट रावेत पर्यंत भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण स्वरगंगा बँड नंदाणे धुळे हे असून भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभघ्यावा असे आवाहन समस्त खान्देश बांधव कानबाई माता उत्सव समिती पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.