Team MyPuneCity –लोकशाहीर, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या (Pimpri Chinchwad)जयंती निमित्त पिंपरी चिंचवड जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतिने अभिवादन करण्यात आले. सकाळी साडे आठ वाजता जिल्हा संघचालक विनोद बंसल व धर्मजागरण समन्वय समितीचे प.महाराष्ट्र प्रांत प्रमुख हेमंत हरहरे यांच्यासह उपस्थितीत संघ कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या निगडी येथिल पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यानंतर लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्याने निगडी पवळे उड्डाणपूल चौकातील लोकमान्य टिळकांच्या अर्ध्याकृती पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Mahesh Landage : पुण्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी आमदार लांडगे मैदानात!
Vadgaon Maval News : वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी

शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्य आयोजित विविध कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत, अभिवादन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, देहू गट संघचालक नरेश गुप्ता, हेमंत हरहरे, समरसता विभागाचे विलास लांडगे,अनिल सौंदडे, नाना कांबळे, सोपान कुलकर्णी,सुहास देशपांडे यांचेसह बहुसंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.