Team MyPuneCity –एमआयडीसी भोसरी मधील (Bhosari)ब्राईट इंडिया टूल्स या दुकानातून ४० लाख ५० हजारांचे साहित्य चोरून नेणाऱ्या मुंबईतील टोळीला एमआयडीसी भोसरी आणि गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली. त्यांच्याकडून ४० लाख ५० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुंबईतून एमआयडीसी भोसरी परिसरात येऊन ही चोरी केली होती.
हुसेनअली शौकतअली सय्यद (४५, नाशिक. मूळ रा. उत्तर प्रदेश), सोहेल फकरुद्दीन कुरेशी (२५, गिरगाव मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश), असिफ युसूफ खान (३९, सायन मुंबई), अजमत अजगर अली (४३, भेंडी बाजार, मुंबई. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Pimpri: पिंपरीत व्यवसायिक तरुणावर गोळीबार
Lonavala : लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यावरण व नागरी सुविधावर आधारित विकास आराखडा तयार करावा – उच्च न्यायालय
पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी गौरीशंकर हलकुडे यांचे एमआयडीसी भोसरी मध्ये ब्राईट इंडिया टूल्स नावाचे दुकान आहे. ११ जुलै रोजी त्यांच्या दुकानातून ४० लाख ५० हजार रुपये किमतीचे कार्बाईड टूल्स आणि कार्बाईड इन्सर्ट मटेरियल चोरीला गेले. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट पाचने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींचा मुंबई आणि उत्तर प्रदेश शोध घेऊन चौघांना अटक केली. आरोपींनी चोरी केलेले सर्व साहित्य मुंबई येथे ठेवले होते. सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.