Team My pune city – पिंपळे सौदागर येथील पीके चौकात (Accident)शुक्रवारी (1 ऑगस्ट) सकाळी अपघात झाला. या अपघातात एका वृद्धाचा डंपर खाली चिरडून मृत्यू झाला.
पंडितराव माधवराव समर्थ (६६, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव (Accident)आहे.
Vadgaon Maval News : वडगावातील अवैध धंदे बंद करण्याची शहर भाजपाची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ यांचे जावई एका खासगी रुग्णालयात ऍडमिट आहेत. त्यांना भेटण्यासाठी समर्थ हे शुक्रवारी सकाळी रुग्णालयात गेले. जावयाला भेटल्यानंतर डॉक्टरांनी काही औषधे आणण्यास सांगितले होते. त्यामुळे ते औषधे आणण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पीके चौकात आल्यानंतर त्यांना एका डंपरने धडक (Accident) दिली. समर्थ हे डंपर खाली चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.