situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chichwad Crime News 31 July 2025 : लाईफटाईम मेंबरशिपच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक

Published On:
Pimpri Chichwad Crime News 31 July 2025

Team My pune city – सोवनिर इंटरनॅशनल प्रा.लि कंपनीच्या ( Pimpri Chichwad Crime News 31 July 2025) नावाने लाईफटाईम मेंबरशिप आणि ट्रॅव्हल पॅकेजच्या आमिषाने ३९ लोकांची २९ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केली. ही घटना सन २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत कोकणे चौक, रहाटणी येथे घडली.

या प्रकरणी श्रीकांत प्रकाश भावसार (३७, वाकड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोवनिर इंटरनॅशनल प्रा.लि कंपनीचे सनी सोनावणे, गणेश पोपळघाट, विशाल दिवाण, मनोज वाल्मिकी, करण शर्मा, मिना शिंदे, आशिष जगताप, पायल दळवी, पल्लवी गावडे, आकाक्षा देशमुख, नागेश साळवी, आयेशा शेख आणि कंपनीचे इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्यासारख्या ३९ लोकांना लाईफटाईम मेंबरशिप आणि लाईफटाईम ट्रॅव्हल पॅकेज देण्याचे आमिष दाखवले. वेगवेगळया आकर्षक ऑफर देऊन, बनावट अॅग्रीमेंट बनवून फिर्यादी आणि ३९ लोकांची एकूण २९ लाख १६ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.


घरगुती सामान बिहारला पोहोचविण्याच्या बहाण्याने फसवणूक ( Pimpri Chichwad Crime News 31 July 2025)

घरगुती सामान पुण्यातून बिहारला पोहोचवतो असे सांगून १२ हजार रुपये घेऊन सामान न पोहोचवता एका व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ जून रोजी एक्झरबिया सोसायटी नेरे दत्तवडी येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनुकल्प कुमार ओझा आणि एका वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळच्या बिहार येथील आहेत. त्यांना पुणे शहरातून काही घरगुती सामान बिहार येथे न्यायचे होते. त्यामुळे त्यांनी आरोपी अनुकल्प याच्याशी संपर्क केला. आरोपीने फिर्यादीला त्यांचे घरगुती सामान पुण्यातून बिहारला पोहोचवतो असे सांगितले आणि त्यासाठी १२ हजार रुपये घेतले. मात्र, ते सामान फिर्यादीच्या बिहार येथील घरी न पोहोचवता त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Kalbhairav Pranpratishtha : श्री काळभैरव प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक फुलसजावट


विद्यार्थ्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण ( Pimpri Chichwad Crime News 31 July 2025)

बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना एका विद्यार्थ्याला अडवून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी साडेसात वाजता सोमाटणे फाटा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आशिष अभिमान सुरवसे (२५, पवार वस्ती, दापोडी), राहुल मिलींद सूर्यवंशी (२४, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चिक्या आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ‘आमच्याकडे काय बघतोस’ असे म्हणून फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी ‘मला मारू नका, मला सोडा’ अशी विनंती करत असताना, त्यांच्यासोबत असलेल्या राहुल नावाच्या व्यक्तीने फिर्यादीच्या डोक्यातील हेल्मेटने त्यांच्या डोक्यात, छातीत, नाकावर आणि तोंडावर मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी आशिष सुरवसे याने लाथा-बुक्क्यांनी छातीत आणि पोटात मारहाण करून गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.


ट्रकची स्कुटीला धडक, महिलेचा मृत्यू ( Pimpri Chichwad Crime News 31 July 2025)

पुनावळे येथे ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (३० जुलै) दुपारी काटेवस्ती चौक ते काटेवस्ती कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडवर पुनावळे येथे घडली.

समीना केशव कुंद्रा (३३) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी केशव गुलाबसिंग कुंद्रा (३६, पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रक (एमएच १४/एचजी ७९०७) चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी समीना या त्यांची स्कुटी घेऊन घरगुती कामासाठी जात होत्या. आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने आणि निष्काळजीपणाने चालवून समीना यांच्या स्कुटीला धडक दिली. या धडकेत समीना यांच्या डोक्यावरून आणि कमरेवरून ट्रकची चाके गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची कोणतीही माहिती न देता ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. रावेत पोलीस तपास करत आहेत.

Poultryshed : पोल्ट्रीशेड नोंदणी अभियान मावळात वेगाने सुरू


ट्रकच्या धडकेत कारचा चकणाचुर ( Pimpri Chichwad Crime News 31 July 2025)

चाकण येथे एका भरधाव वेगातील ट्रकने कारला पाठीमागून धडक दिली. कार पलटी होऊन डिव्हायडरवर ढकलली गेली, ज्यात कारचालक गंभीर जखमी झाला. तर कारचा चकणाचुर झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुलै) मेदनकरवाडी येथे घडली.

या प्रकरणी जखमी कार चालक सचिन निंबा बोरसे (२९, मेदनकरवाडी, खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक (एमएच ०४/जीसी ५५८०) चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे त्यांच्या कारने घरी जात असताना आरोपीने ट्रक भरधाव वेगाने चालवून कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये कार पलटी होऊन डिव्हायडरच्या दुसऱ्या बाजूला ढकलली गेली. यात कारचे मोठे नुकसान झाले आणि फिर्यादी गंभीर जखमी झाले. आरोपीने फिर्यादीला कोणतीही वैद्यकीय मदत न करता अपघात ठिकाणावरून ट्रक सोडून पळ काढला. चाकण पोलीस या प्रकरणाचा आहेत.

Follow Us On