situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi robbery case : मोबाईल ट्रेस होऊ नये म्हणून दरोडेखोरांकडून वॉकी टॉकीचा वापर

Published On:
Nigdi robbery case

निगडी दरोडा प्रकरणी दोघांना अटक

Team My pune city – निगडी प्राधिकरण परिसरात वृद्ध नागरिकाला बांधून, पिस्तूलाचा धाक दाखवत तब्बल ६.१५ लाख रुपयांचा( Nigdi robbery case) ऐवज लुटण्याची घटना १९ जुलै रोजी घडली. या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या टोळीतील आरोपींचा राजस्थान पर्यंत १२०० बाराशे किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी त्यांना अटक केली असून तिसऱ्या स्थानिक आरोपीला तळेगावहून पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गुन्हा केल्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले आहे.

PCMC : १५० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ५७ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध

सुरेश लादुराम ढाका उर्फ बिष्णोई (२९, राजस्थान), महिपाल रामलाल बिष्णोई (१९, वडगाव मावळ. मूळ रा. राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे ( Nigdi robbery case) आहेत. मुख्य सूत्रधार सुभाष बिष्णोई आणि अन्य तिघांचा शोध सुरु आहे.

निगडी प्राधिकरण येथे १९ जुलै रोजी सायंकाळी एका जेष्ठ नागरिकाच्या बंगल्यात दरोडेखोरांनी घुसखोरी करत वृद्धाचे हातपाय बांधले, तोंडावर चिकटपट्टी लावली. त्यानंतर घरातील कपाटे उचकून ६ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम चोरून नेली होती. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता ( Nigdi robbery case) विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये पथकाने सुमारे १२०० किलोमीटर प्रवास केला. तसेच, २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

Poultryshed : पोल्ट्रीशेड नोंदणी अभियान मावळात वेगाने सुरू

राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश ढाका याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिपाल बिष्णोई याला तळेगाव येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून फिर्यादीच्या ( Nigdi robbery case) पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली आहे.

सुरेश ढाका याच्या विरोधात राजस्थान आणि गुजरात राज्यांत २१ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी आरोपींनी वॉकी टॉकीचा वापर केला. पाच जण स्विफ्ट कारमधून आले. घरात घुसल्यावर एकाने निगराणी ठेवली, एकाने पाळत ठेवली तर उर्वरित आरोपींनी लूट केली. परस्पर संपर्कासाठी त्यांनी मोबाईल ऐवजी वॉकी टॉकी( Nigdi robbery case) वापरले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पांडुरंग देवकाते, पोलीस अंमलदार महेश खांडे, सोमनाथ मोरे, नितीन लोखंडे, विनोद वीर, अमोर गोरे, गणेश सावंत, गणेश कोकणे, हर्षद कदम, गणेश हिंगे, समीर रासकर, अमर कदम, नितीन उमरजकर, प्रवीण कांबळे, पवन वाजे, विशाल गायकवाड, चंद्रकांत गडदे, मोहसीन आत्तार, सुमित देवकर, ज्ञानेश्वर कौलगे, औदुंबर रोंगे यांनी ( Nigdi robbery case) केली.

Follow Us On