Team My pune city – पिंपरी रिपब्लिकन सेनेच्या ( Republican Sena) पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी गुलाब पान पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी ही नियुक्ती केली आहे.
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब पानपाटील यांनी रिपब्लिकन सेनेत पक्ष प्रवेश ( Republican Sena) केला. त्यानंतर त्यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Rashi Bhavishya 31 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
यावेळी बोलताना गुलाब पानपाटील म्हणाले की, सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास खरा करूनच दाखवणार आहे. माझ्या पक्ष प्रवेश करतेवेळी मुकुंद रणदिवे यांनी पुढाकार घेऊन माझा पक्ष प्रवेश घडवून ( Republican Sena) आणला.
पक्षप्रवेशावेळी वेताळ नगर चिंचवड मधील सुमेध बुद्ध विहाराचे संस्थापक अध्यक्ष दत्तासाहेब कांबळे, आझाद समाज पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष प्रकाश कांबळे व महिला वॉर्ड अध्यक्ष अंजलीताई गायकवाड, शेवंताताई कांबळे आदींनी देखील पक्ष प्रवेश ( Republican Sena) केला.
याप्रसंगी भीमराव सुरवसे, माजी अध्यक्ष राजु गायकवाड, रमेश कांबळे रिपब्लिकन सेनेच्या प्रदेश सदस्य रेशमाताई शेख, खेड तालुक्याचे महिला अध्यक्ष आशा ताई कुटे, व सुनिताताई कांबळे आदी ( Republican Sena) उपस्थित होते.