Team My pune city –. पू.गुरुवर्य कुंभार गुरुजी यांच्या( Alandi) पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण दि.२४ ते ३१ आळंदी मध्ये आयोजन केले आहे. यामध्ये पहाटे ४ ते ६ काकडा,सकाळी ६ ते ७ विष्णुसहस्रनाम,७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण,सकाळी १० ते १२ गाथा भजन , दु.४ ते सायं.५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ , सायं.७ ते रात्री ९पर्यं
त कीर्तन,रात्री १० ते १२ संगीत भजन असे धार्मिक कार्यक्रम आयोजीत केले जात आहेत. काल दि.२९ रोजी या सप्ताहा मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचकांचा सत्कार करत सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात आले तसेच संतपुजन करण्यात ( Alandi) आले.
हा सत्कार शेंडगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.गुरुवर्य कुंभार गुरुजी शि.संस्थेचे अध्यक्ष ह भ प पंडित महाराज क्षीरसागर यांना अखिल भारतीय मराठा महासंघ आघाडीचे पुणे जिल्हा विभागीय अध्यक्ष पद प्रदान करण्यात आले . गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी जीवन पुरस्कार २०२५ हा ह भ प विष्णू देवानंद भारती महाराज यांना देण्यात ( Alandi) आला.
Rashi Bhavishya 30 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
वारकरी जीवन पुरस्कार बाळासाहेब मोहिते पाटील यांना देण्यात आला.तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी चे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर,विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या सन्मान करण्यात ( Alandi) आला.





















