situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

PCMC : महापालिकेच्या अग्निशामक विभागाची ‘Know Your Fire Station’ मोहीम

Updated On:
PCMC

प्रत्येक सेकंद महत्त्वाचा! योग्य नंबरवर कॉल करून विनाविलंब मदत मिळवण्याचे आवाहन!

Team My Pune City – मुसळधार पावसामुळे (PCMC)पवना, इंद्रायणी, मुळा आणि मुठा नद्यांची धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोणावळा परिसरात जोरदार पाऊस सुरू असून पवना व मुळशी धरणातूनही नियंत्रित विसर्ग सुरू आहे. यामुळे संगमवाडीसह नदीकाठच्या परिसरांमध्ये (बॅकवॉटर चे) पाणी साचण्याचा धोका आहे.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाने ‘Know Your Fire Station’ ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. पूरस्थितीत किंवा इतर आपत्कालीन प्रसंगी नागरिकांनी प्रथम आपल्या झोननिहाय अग्निशामक केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशामक विभागाने केले आहे.

Annabhau Sathe Award : “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार” डॉ. शेटीया माय – लेकीला जाहीर


Senior citizens : ५५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात – एक सामाजिक गरज

महानगरपालिकेने संभाव्य धोकादायक भागांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पूर नियंत्रण पथके सज्ज ठेवली असून आपत्कालीन साधनसामग्री आणि अग्निशामक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी हवामान विभाग आणि महापालिकेच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष देत, अफवांवर विश्वास न ठेवता योग्य माहितीच्या आधारे तात्काळ निर्णय घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

झोननुसार अग्निशामक केंद्र आणि त्यांचे आपत्कालीन संपर्क क्रमांक
झोन A (अ) – प्राधिकरण अग्निशमन केंद्र – ७०३०९०८९९३
झोन B (ब) – चिखली अग्निशमन केंद्र – ७०३०९०८९९५
झोन C (क) – भोसरी अग्निशमन केंद्र – ७०३०९०८९९२
झोन D (ड) – रहाटणी अग्निशमन केंद्र – ७०३०९०८९९४
झोन E (ई) – मोशी अग्निशमन केंद्र – ८६००६९४१०१
झोन F (फ) – तळवडे अग्निशमन केंद्र – ७०३०९०८९९६
झोन G (ग) – थेरगाव अग्निशमन केंद्र – ८९५६०३९२४५
झोन H (ह) – पिंपरी (मुख्य) अग्निशमन केंद्र – ८४८४०८११०१ (२१०१)

आपत्कालीन परिस्थितीत ७७५७९६६०४९, / ७०३०९०८९९१ या क्रमांकावर किंवा आपल्या जवळच्या अग्निशामक केंद्राला संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महानगरातील नद्यांची स्थिती व प्रभागनिहाय माहिती

महानगरपालिकेच्या हद्दीत पवना नदी (लांबी ४८ कि.मी.), इंद्रायणी नदी (लांबी ८५ कि.मी.) आणि मुळा नदी (लांबी ५० कि.मी.) अशा तीन प्रमुख नद्या आहेत. यापैकी ब प्रभागातून पवना नदी, क प्रभागातून इंद्रायणी नदी तर ड प्रभागातून मुळा व पवना नदी वाहते.

संभाव्य बाधित भागांची यादी

महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पूरस्थितीत बाधित होण्याची शक्यता असलेल्या भागांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये
अ प्रभाग – भाटनगर, बौध्दनगर, आंबेडकर कॉलनी.
ब प्रभाग – रावेत एसटीपी, जाधववाडी घाट, वाल्हेकरवाडी, लक्ष्मीनगर, किवळे.
क प्रभाग – निरंक.
ड प्रभाग – पिंपळे निळख, शिक्षक सोसायटी, वाकड गावठाण, पिंपळे गुरव, पिंपरी.
ई प्रभाग – बोपखेल रामनगर.
फ प्रभाग – निरंक.
ह प्रभाग – सांगवी, मुळानगर भाग, गुलाबनगर झोपडपट्टी, वंजारीवस्ती कासारवाडी, भारतमाता नगर, फुगेवाडी.

ग प्रभाग – थेरगाव, संजय गांधीनगर, झुलेलाल घाट, पवना नगरघाट, रहाटणी, पिंपरी.

पावसाची तीव्रता वाढल्यामुळे पाणीपातळीवर सतत लक्ष ठेवणे सुरू आहे. आमचे पथक धरणांमधून होणाऱ्या विसर्गावर देखील लक्ष ठेवत आहे. नदीकाठच्या किंवा खालच्या पट्ट्यातील घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना व महापालिकेच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये. शक्यतो नदीकाठच्या ठिकाणी अनावश्यक वावर टाळावा. आम्ही परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज आहोत. कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी महापालिका प्रशासन तातडीने मदत पुरवेल.

– प्रदीप जांभळे- पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाणीपातळी वाढल्याची लक्षणे दिसताच नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. आपत्कालीन परिस्थितीत सर्वात आधी जवळच्या अग्निशामक केंद्राला संपर्क साधावा. त्यामुळे विनाविलंब मदत मिळणे शक्य होईल. पूर्वपरिस्थितीत बचावकार्यासाठी लागणाऱ्या आवश्यक साधनसामग्रीसह आमचे प्रत्येक अग्निशामक केंद्र सज्ज आहेत.

  • उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Follow Us On