Team My Pune City – नागपंचमी या पारंपरिक सणानिमित्त, प्रभागातील (Pimpri Chinchwad)महिलांसाठी विशेष पूजाविधीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सौ. निर्मलाताई सदगुरू कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत, खराळवाडी येथील श्री खराळाई मंदिर येथे सकाळी ८:०० वाजल्यापासून नागदेवतेच्या पूजेस सुरुवात झाली. महिलांसाठी हा सण सश्रद्धतेने साजरा करता यावा, तसेच पारंपरिक संस्कृती जपली जावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Pune: व्याघ्र दिनाचे औचित्य साधत जंगलातील ‘सुपरमॉम’ची मुलांना झाली तोंडओळख
Vadgaon Maval: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश व चावी वाटपाचा भव्य सोहळा पार पडला

कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून भक्तिभावाने पूजा केली. स्थानिक नागरिकांनी सौ. कदम यांचे अभिनंदन करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली.
सौ. निर्मलाताई कदम यांनी उपस्थित सर्व महिला भाविकांचे आभार मानले व सांगितले की, “आपल्या संस्कृतीतील सण-उत्सव एकत्र येण्याची, श्रद्धा आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याची संधी देतात. अशा पूजाविधीमधून महिला वर्गाला सामील करून घेणे, हे सामाजिक सलोख्यासाठी महत्त्वाचे आहे.”