Team My Pune City – जंगलातील ‘सुपरमॉम’ म्हणून ओळखल्या (Pune)जाणाऱ्या वाघिणीची तोंडओळख मुलांना व्हावी, तिचे जंगलातील स्थान व त्या अनुशंगाने तिचे असलेले महत्त्व येणाऱ्या पिढीला समजावे आणि पर्यायाने नागरिकांमधील वन्यजीव साक्षरता वाढावी या उद्देशाने पुण्यातील जंगल बेल्स या संस्थेच्या वतीने ‘सुपरमॉम ऑफ अवर फॉरेस्ट्स’ उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 29 जुलै रोजी साजरा करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधत कोथरूड मधील परांजपे विद्या मंदिर येथे मुलांसाठी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जुलै रोजी साजऱ्या झालेल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधत पुण्यातील परांजपे विद्या मंदिर येथे पाचवी व सहावीच्या मुलांसाठी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जंगल बेल्स संस्थेच्या हेमांगी वर्तक यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परांजपे विद्या मंदिरच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता रांजेकर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अभिजाता चव्हाण, दोन्ही वर्गांच्या शिक्षिका, जंगल बेल्स संस्थेचे संजय देशपांडे, मधुलिका तिजरा, सौरभ चव्हाण आणि सिद्धेश सोनावणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
रानगवा, हरीण, हत्तीण हे जंगलातील महत्त्वाचे मादी प्राणी असून जंगलातील सर्वात मोठा ‘भक्षक’ आणि जंगलातील जीवनचक्राच्या शिखरावर असलला प्राणी म्हणजे वाघीण आहे, असे सांगत वर्तक यांनी देशातील महत्त्वाच्या वाघिणींची तोंडओळख विद्यार्थ्यांना करून दिली. यामध्ये ताडोबामधील छोटी तारा व माया, ताडोबा बफर मधील जुनाबाई, पेंच मधील माताराम, संजय गांधी व्याघ्र प्रकल्पातील मौसी मां, ताडोबा येथील कोलारा बफर मधील के मार्क यांबरोबरच उमरेड करांडला येथील एफ टू आणि फेअरी या वाघिणींचे फोटो दाखवत त्यांची माहिती वर्तक यांनी विद्यार्थ्यांना दिली.
आपल्या 14 वर्षांच्या आयुष्यात एका वेळेस 1-5 पिलांप्रमाणे वाघिणी तब्बल 4 ते 5 वेळा पिलांना जन्म देते. तीन महिने इतका तिचा बाळंतपणाचा काळ असून पिले 28 ते 30 महिन्यांची होईपर्यंत वाघीण आपल्या बछड्यांची काळजी घेते अशी माहिती हेमांगी वर्तक यांनी दिली. कोणत्याही नर वाघाची मदत न घेता वाघीण आपला बाळंतपणाचा काळ आणि त्यानंतर बछड्यांचा वाढीचा काळ एकटीच सर्व गोष्टी करते. यामध्ये शिकार करणे, बछड्यांचे व स्वत:चे संरक्षण करणे, त्यांना दूध पिऊ घालणे या सर्वांचा समावेश असतो. त्यामुळे वाघीण ही खऱ्या अर्थाने ‘सुपरमॉम’ आहे. हा सर्व काळ वाघीण केवळ तिची अंतःप्रेरणा व अथक इच्छाशक्तीवर तग धरून असते अशी माहितीही त्यांनी दिली.
Ajit Pawar:पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी
Vadgaon Maval: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश व चावी वाटपाचा भव्य सोहळा पार पडला
नैसर्गिक आणि मानवनिर्मिती संकटांचा सामना करणाऱ्या वाघिणीला एक जबाबदार सरकार म्हणून संरक्षण देण्याचा पूर्ण प्रयत्न आपल्या देशात होत असून यामध्ये 1973 सालापासून सुरु असलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ हा व्याघ्र संरक्षक प्रकल्प, वाघांच्या हालचालीची माहिती व्हावी यासाठी जीपीएस व इतर अॅप्स, फॉरेस्ट पेट्रोलिंग, जंगलाशेजारीच प्राण्यांसाठीच्या सेफ झोन व गायरानांची उभारणी, कॅमेरा अलार्म, जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या गावांतील नागरिकांना वन्यजीव साक्षर करणे, जनावरांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदतीची हमी अशा अनेक बाबींचा समावेश असल्याचे वर्तक यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मुलांनीह उत्साहाने जंगल बेल्स च्या टीमला अनेक प्रश्न विचारत जंगला विषयी माहिती करून घेतली.