Team My pune city – पिंपरी-चिंचवड शहरात धर्मांतराचा एक ( Conversion ) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी येथील सिंधी समुदायातील नागरिकांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्यासाठी प्रलोभने दिली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी एका अमेरिकन नागरिकासह तिघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथे घडली.
Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीची शतकपूर्ती
पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपराध क्रमांक भारतीय न्याय संहिता २९९, ३(५), विदेशी नागरिक कायदा कलम १४ (ब)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सनी बन्सीलाल दनानी (२७, रा. पिंपरी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार शेफर जेविन जेकब (४१, कॅलिफोर्निया, अमेरिका, सध्या मुकाई चौकाजवळ किवळे, पुणे), स्टीवन विजय कदम (४६, उद्यम नगर, अजमेरा, पिंपरी) आणि एक ( Conversion ) अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेफर जेकब व स्टीवन कदम यांना अटक करण्यात आली आहे.
Rashi Bhavishya 28 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
फिर्यादी सनी दनानी यांच्या तक्रारीनुसार, घटनेच्या दिवशी आरोपींनी त्यांना ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख, शांती, संपत्ती तसेच मानसिक स्वास्थ्य मिळेल, असे सांगून प्रलोभने ( Conversion ) दिली. तसेच, “या विश्वात केवळ प्रभू येशूच देव आहे, इतर देव व धर्म हे केवळ कथा आहेत. इतर देवी देवतांना तुम्ही न मानता येशूला देव माना,” असे सांगितले.
धर्मांतर केल्यास भविष्यात आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासन देऊन फिर्यादीवर दबाव आणण्यात आला. या कृत्यातून फिर्यादीच्या धर्माचा व धार्मिक श्रद्धेचा अपमान करून त्यांच्या धार्मिक भावना ( Conversion ) दुखावल्याचा आरोप आहे. पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींची अंगझडती घेण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
सेंट्रल पंचायत, पिंपरी या प्रमुख संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की पिंपरी कॅम्प परिसरात ( Conversion ) उघडकीस आलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. अमेरिकन नागरिक शेफर जेकब आणि दोन अन्य व्यक्ती सिंधी समुदायाला ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्यासाठी प्रलोभने देऊन बायबलची पत्रके वाटप करत असल्याची माहिती समोर आली आहे.
सिंधी समुदाय हा त्यांचा मोठा लक्ष्य असल्याचे समजले आहे. अनेक सिंधी बांधव खोट्या प्रलोभनांना बळी पडून धर्मांतरित झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी सरकारला यावर तात्काळ कारवाई करून अशा प्रलोभनांवर आळा घालण्याची विनंती केली आहे, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या धर्मातून जबरदस्तीने किंवा प्रलोभनाने दूर केले जाऊ ( Conversion ) नये.