Team My pune city – काल दि.२५ रोजी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी नातवंडासोबत दर्शनाला आलेल्या ज्येष्ठ (Alandi) भाविक बेशुद्ध झाले.
प्रसंगवधान दाखवत कर्मचारी गणेश जामोदे यांनी त्या भाविकास शुद्धीत आणण्यासाठी प्राथमिक उपचार केले. त्या दरम्यान तेथे उपस्थित असलेले आळंदीतील नागरिक प्रतीक लुणावत यांनी
रुग्णवाहिकेस कॉल (Alandi) केला.
Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 2
कॉल केल्या नंतर काही वेळाने रुग्णवाहिका आली. त्या रुग्णवाहिकेतून त्या ज्येष्ठ भाविकास उपचारासाठी आळंदी रुग्णालयात नेण्यात आले. देवस्थान कर्मचारी तुकाराम माने,गणेश जमोदे,अमोल मुंडे ,प्रतीक लुणावत यांनी त्या भाविकास रुग्णालयात दाखल केले.ग्रामीण रुग्णालयातील उपचारा नंतर त्यांना घरी
सोडण्यात आले. सदर भाविक परभणी येथील (Alandi) होता.