Team My pune city –गेल्या दोन तीन दिवसांपासून पुन्हा ( Indrayani River ) पावसाने राज्यात ठिक ठिकाणी जोरदार हजेरी लावली आहे. तसेच मावळ व धरणक्षेत्र परिसरात ही संततधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. आळंदीतील भक्ती सोपान पुलावरून पाणी गेले आहे. भक्त पुंडलिक मंदिर व तेथील दगडी घाट परिसर पाण्या खाली गेला आहे.
Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, 24 तासांत 172 मिमी पावसाची नोंद
त्रिवेणी भागीरथी कुंड पाण्याखाली असून त्यावरील दगडी घाट पाण्याखाली आला आहे. चाकण पुला शेजारील बंधाऱ्या वरून तसेच सिद्धबेट जवळील बंधाऱ्या वरून पाणी ( Indrayani River ) वाहत होते.
Alandi: वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मारकाजवळील अतिक्रमण हटविणे बाबत आळंदी नगरपरिषदेस निवेदन
आळंदी नगरपरिषद कर्मचारी काल पासून पालिकेस तेथील माहिती देत आहेत. इंद्रायणी नदी पात्रातील पाण्याची वाढल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे प्रशासनाच्यावतीने ( Indrayani River ) आवाहन करण्यात आले आहे.