Team My pune city –आळंदी दिघी वाहतूक विभाग यांना सार्वजनिक जागेत वाहन उचल (Alandi)कार्यवाही संदर्भात निवेदन देण्यात आले.दिघी व आळंदी परिसरात वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी वाहन उचल मोहीम राबवली जात आहे.त्यामध्ये गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. असे या निवेदाद्वारे त्यांना सांगण्यात आल्या आहेत.१) अनेक ठिकाणी नो पार्किंग चे बोर्ड नसताना गाड्या उचलल्या जात आहेत.२)काही ठिकाणी फक्त एकच पाटी लावून नो पार्किंग झोन केल्यासारखे वागले जात आहे.३) गाडी उचलताना जर मालक उपस्थित असेल, तर त्याला गाडी परत द्यावी,हे कायद्याचं आणि सामान्य न्यायाचे भान पाहिजे.४) प्रशासनाकडून जर नियमानुसार सूचना फलक, स्पष्ट मार्गदर्शन आणि योग्य व्यवस्था नसेल, तर वाहनचालकाला शिक्षा देणे हा सरळ अन्याय आहे.
सद्यस्थतीतील कार्यपद्धती ही नागरिकांमध्ये रोष व गैरसमज नर्माण करणारी आहे. प्रशासनाने कारवाई करताना योग्य नियम, स्पष्ट चिन्ह आणि लोकांना घोषणा (अनाउन्समेंट) देऊन करावी. वाहतूक पोलीस विभाग अधिकारी नांदुरकर यांना हे निवेदन देण्यात आले.नागरिकांना होणाऱ्या त्रासाविषयी चर्चा करण्यात आली . स्थानिक स्थरावर नागरिकांशी चर्चा व संवाद साधुन सहकार्य करावे .असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Pavana Dam : संतत धार पावसामुळे मागील 15 तासात पवना धरणात 2 टक्क्यांची वाढ,सकाळी 1400 क्युसेक ने करणार विसर्ग
भाविकांना कसल्या प्रकारचा त्रास होणार नाही. नियमा प्रमाणे कारवाई केली जाईल. असे आश्वासन वाहतूक पोलीस विभागाकडून देण्यात आले.
यावेळी कृष्णा काकडे , सौरभ गव्हाणे , शुभम पोमन, आशिष तापकीर ,सचिन काकडे करण सोळंके , शुभम मस्के इ .आळंदीतील युवक निवेदन देताना उपस्थित होते.
च- होली फाटा येथे टोइंग व्हॅन मध्ये वाहन उचलताना एकास दुखापत
च-होली फाटा येथे शुभम बिराजदार यांचे(ऍक्टिव्हा) दुचाकी वाहन टोइंग व्हॅन द्वारे उचलताना हुक लागून त्यांच्या डोळ्यास लागून डोळ्यास दुखापत झाली.तत्काळ त्यांना पुढील उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.अशी यावेळी आळंदीतील स्थानिक नागरिकाने माहिती दिली.तसेच सदर प्रकार वाहतूक पोलीस निरीक्षक यांना सांगण्यात आला आहे.