तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास यशस्वी; खूनाची (Dhanore Murder) कबुली
Team MyPuneCity – आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या (Dhanore Murder) गंभीर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावत आळंदी पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांनी खून केल्याची कबुली घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.
फिर्यादी लता प्रकाश भुते (वय ३८, रा. विकासवाडी, धानोरे, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. लाखांदूर, जि. भंडारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पती प्रकाश विठोबा भुते (वय ३९) यांचा खून करण्यात आला आहे. ही घटना दिनांक २३ जुलै रोजी सायंकाळी ६.३० ते २४ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. न्यू हिना हेअर कटिंग सैलूनजवळ, आय.जी.डब्ल्यू. टेक्नोलॉजीज कंपनीच्या बाजूला, आळंदी–मरकळ रोडवरील धानोरे (Dhanore Murder) येथे हे ठिकाण आहे.
Sangvi suicide Case : पतीने घेतला गळफास, शेजारीच पत्नीही आढळली मृतावस्थेत
या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दोन आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. त्यामध्ये कुंडलिक ज्ञानदेव काळे (वय २१, रा. चन्होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. दाभा, ता. मंळरूळपिर, जि. वाशिम) आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार यांचा समावेश आहे.
चौकशीत त्यांनी प्रकाश भुते यांच्यावर सिमेंटचा ब्लॉक टाकून त्यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. आळंदी पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत कसोशीनं आणि तत्परतेनं तपास करत तात्काळ कारवाई केली.
DJ ban : डीजे बंदीचा निर्णय सर्वच प्रकारच्या मिरवणुकांना लागू
या तपास कार्यामध्ये (Dhanore Murder) पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३) बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त (चाकण विभाग) राजेंद्रसिंह गौर यांचे मार्गदर्शन लाभले.
तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. डी. जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल दुधमल, पोलीस हवालदार संजय जाधव, वहील, होले, दोडके, साबळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब खेडकर, शरद निकाळजे, स्वामी नरवडे, अमित डिखळे, नारायण सूर्यवंशी, हरिराम डुमंनर, रामदास दहिफळे, तसेच परिमंडळ-३ कार्यालयातील सहाय्यक पोलीस फौजदार राजू जाधव यांनी सहभाग घेतला.
पोलीस उप आयुक्त बापू बांगर यांनी यशस्वी तपासाबद्दल (Dhanore Murder) संपूर्ण पथकाचे कौतुक केले असून, गुन्ह्याच्या पार्श्वभूमीची सखोल चौकशी सुरू आहे.