situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

L’Oreal India Company : लॉरियाल इंडिया कंपनीत पाचवा वेतनवाढ करार यशस्वी; कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

Published On:
L'Oreal India Company

Team My Pune City— म्हाळुंगे येथील लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (L’Oreal India Company) कंपनीत व्यवस्थापन आणि लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्यात ऐतिहासिक पाचवा वेतनवाढ करार करण्यात आला. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी झालेल्या या करारामुळे कामगार वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

या करारात कोणत्याही उत्पादनाशी संबंधित अटीशिवाय सर्व कामगारांना समान पगारवाढ मिळाली आहे. एकूण सरासरी वेतनवाढ रु. २०,३३०/- इतकी असून त्यामध्ये विविध भत्त्यांचा समावेश आहे. पहिल्या वर्षी रु. ७,७११/-, दुसऱ्या वर्षी रु. ६,७५०/- तर तिसऱ्या वर्षी रु. ५,८६९/- इतकी वाढ मिळणार आहे. पगारातील फरक जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहे.

Sangvi suicide Case : पतीने घेतला गळफास, शेजारीच पत्नीही आढळली मृतावस्थेत

करारात रात्रपाळी भत्ता (रु. १५०/दिवस), सेव्हन डे भत्ता (रु. १,२७०/महिना), पालकत्व, प्रसूती, दत्तक व सरोगसी रजा, प्रजनन उपचार रजा, गंभीर आजारासाठी विशेष रजा, शालेय फीच्या काळात वेतन अ‍ॅडव्हान्स, फ्लोटर मेडिक्लेम, ग्रुप टर्म व अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स, शिष्यवृत्ती योजना, खेळ व सांस्कृतिक महोत्सव, फॅमिली डे, मृत्यूनंतर सहाय्य निधी यांसारख्या अनेक कल्याणकारी तरतुदी करण्यात आल्या आहेत.

कंपनी उत्पादन खरेदीसाठी ऑनलाईन सुविधा, मेडिकल रूम व रेस्ट रूम, महिला दिन, रक्षाबंधन, वाढदिवस, विवाह भेट, कंपनी शेअर्ससाठी पात्रता, दिर्घ सेवा पुरस्कार, सेवानिवृत्ती भेट, रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम, संगणक व इंग्रजी प्रशिक्षण यासह अनेक सुविधा (L’Oreal India Company) करारात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

सदर कराराच्या वेळी कंपनीच्या वतीने प्लांट डायरेक्टर अमित गर्ग, एच.आर. प्रमुख संतोष कदम, फायनान्स हेड रॉबिन विजय, प्रोडक्शन हेड सत्या सिंह, क्वालिटी हेड संजीव कुमार, तसेच लॉजिस्टिक्स, सेफ्टी व एचआर विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Sangvi suicide Case : पतीने घेतला गळफास, शेजारीच पत्नीही आढळली मृतावस्थेत

संघटनेच्या वतीने अध्यक्ष अविनाश वाडेकर, सेक्रेटरी गणेश बोचरे, खजिनदार रवि साबळे, उपाध्यक्ष निलेश पाटोळे, कार्याध्यक्ष कमलेश गावडे, सहसचिव रूपाली शिंदे व मुकुंद म्हाळुंगकर, तसेच (L’Oreal India Company) कार्यकारिणी सदस्यांनी सह्या केल्या. याशिवाय साक्षीदार म्हणून कंपनी व संघटनेच्या प्रतिनिधींनी सह्या केल्या.

या करारासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, कार्याध्यक्ष दत्तात्रय येळवंडे, उपाध्यक्ष राजू अण्णा दरेकर व सचिव गणेश जाधव यांचे विशेष मार्गदर्शन (L’Oreal India Company) लाभले.

करारानंतर कर्मचाऱ्यांनी आनंदाने पेढे वाटून आणि नृत्य करून जल्लोष साजरा केला. यावेळी कराराच्या स्मृतीप्रित्यर्थ टी-शर्ट वाटप करण्यात आले. कामगारांनी संघटनेच्या अथक प्रयत्नांचे आणि एकजुटीच्या ताकदीचे मनापासून कौतुक केले.

हा करार कंपनी आणि कामगार यांच्यातील सकारात्मक संबंधांचे प्रतिक ठरला असून, उद्योगक्षेत्रात एक आदर्श म्हणून नोंदवला जात (L’Oreal India Company) आहे.

Follow Us On