Team My pune city – शालेय मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबर मूल्य शिक्षण व संस्कारांची पण लहान वयातच पेरणी व्हावी जी आज काळाची( Dnyaneshwar Vidyalaya ) गरज आहे .या दृष्टिकोनातून गेल्या पाच वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने सुरू केलेला ओळख श्री ज्ञानेश्वरीची या आळंदी पॅटर्न उपक्रम जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील एकूण १०० शाळांनी स्वीकारला त्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये आज ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाच्या पाचव्या वर्गाचा शुभारंभ संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त ह. भ. प. शिवाजी महाराज काळे, अष्टविनायक फिनिशर्स कं. एमआयडीसी पिंपरी चिंचवड चे संचालक उद्योजक लक्ष्मण बालवडकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, ( Dnyaneshwar Vidyalaya ) ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, ह. भ. प. सुभाष महाराज गेठे, श्रीधर घुंडरे, अनिल वडगावकर, धनाजी काळे ,विश्वंभर पाटील विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, अनुजायीनी राजहंस, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Alandi : आळंदीमधील मरकळ रस्ता विभाग परिसरात गढूळ पाणीपुरवठा
यानिमित्ताने “ओळख श्री ज्ञानेश्वरीची” चतुर्थ वर्गातील १८ गुणवंत विद्यार्थी तसेच गत वर्षात हरिपाठ पाठांतर मध्ये प्राविण्य मिळवलेल्या (५ वी ड) व (६ वी ई) वर्गातील विद्यार्थ्यांना तसेच हरिपाठ अर्थ विवेचन परीक्षेतील गुणवंत १० विद्यार्थ्यांना संतांच्या नवलकथा पुस्तक व रोख रक्कम देऊन ( Dnyaneshwar Vidyalaya ) मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच नववर्षात ओळख श्री ज्ञानेश्वरी ची उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना फाईल व ज्ञानेश्वरीची पारायण प्रतीचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सचिव अजित वडगावकर यांनी ज्ञानदेवांच्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीची महती सांगताना ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नसून एक आदर्श जीवन जगण्याचे शास्त्र असल्याचे सांगितले. या उपक्रमात विद्यार्थ्यांवर झालेले संस्कार याबद्दल माहीती त्यांनी सांगून प्रत्येक शाळेत हा उपक्रम का राबवला जावा याविषयी( Dnyaneshwar Vidyalaya ) सांगितले.
PMPML : पीएमपीएमएलची पुणे लोणावळा मार्गावर पर्यटन बस सेवा
श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपक्रम यशस्वी पणे राबवण्याकरता गेली पाच वर्षे प्रयत्नशील आहेत त्यात प्रामुख्याने शुभांगी कारंजकर, ( Dnyaneshwar Vidyalaya ) विठ्ठलदास गुट्टे, प्रकाश भागवत, लता बिरदवडे हे शिक्षक व राजू सोनवणे ,सावळाराम देशमुख व दिनेश भंगाळे हे शिक्षकेतर कर्मचारी विशेष मेहनत घेत असल्याचे सांगून त्यांचे कौतुक केले.
गायत्री लोहोर व राधिका फपाळ या विद्यार्थिनींनी ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमामुळे शिक्षणाबरोबरच भविष्यात जीवनामध्ये या ज्ञानाचा उपयोग होईल आणि जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडेल असा विश्वास व्यक्त केला.
तदनंतर प्रकाश काळे यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमातून मूल्य शिक्षण दिले जात असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानेश्वरीतील ज्ञान / विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्व क्षेत्रातून प्रयत्न व्हायला हवा. यासाठी माऊली आपणा सर्वास ऊर्जा( Dnyaneshwar Vidyalaya ) देतील असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर व लक्ष्मण बालवडकर यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत सदर उपक्रम खूप मोठा असून याचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असे सांगितले.
नंतर सुभाष महाराज गेठ्ठे यांनी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अतिशय नेटाने गेली पाच वर्ष हा उपक्रम यशस्वीपणे राबवीत असल्याचे सांगितले .
या उपक्रमामुळे समाजावर झालेला सकारात्मक बदल तसेच शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना संस्कार मिळावेत म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान ,श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व आळंदीतील पत्रकार यांच्या वतीने ज्ञानेश्वरीतील विद्यार्थी जीवनात उपयुक्त असणाऱ्या ओव्या वेचून एक आदर्श अभ्यासक्रम तयार करून त्याचे पुस्तक प्रकाशन करण्यात आल्याचे( Dnyaneshwar Vidyalaya ) सांगितले.
तसेच सर्वांनी एकत्र येऊन हा संस्काराचा दीप समाजाच्या कानाकोपऱ्यात तेवत ठेवून अंधकार रुपी अज्ञान दूर करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही केले. शेवटी अध्यक्षीय मनोगतातून शिवाजी महाराज काळे यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत ओळख श्री ज्ञानेश्वरी ची एक परिवार ( Dnyaneshwar Vidyalaya ) यांचे अभिनंदन केले.
सदाचार व संस्कार देणारे विद्यालय म्हणून श्री ज्ञानेश्वर विद्यालयाची ओळख झालेली आहे. त्यामागे अजित वडगावकर व या सर्व विश्वस्त मंडळांची, शिक्षकांची मेहनत आहे. संस्कृती आणि संस्कार ही भारताची प्राचीन परंपरा जगात पसरविण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व प्राचार्य सूर्यकांत मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता ( Dnyaneshwar Vidyalaya ) झाली.