Team My pune city – आळंदी शहरात (Alandi) आज काही भागात गढूळ पाण्याचा पाणी पुरवठा झाला.गढूळ पाणी पुरवठा झाल्याने नागरिकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
Pune Metro : पुणे मेट्रोचा ‘वन पुणे विद्यार्थी पास’ आता मोफत
पाणी मोठय़ा प्रमाणावर गढूळ असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.आळंदी येथील मरकळ रस्ता विभागा मध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा झाला असून त्याचे व्हिडिओ काही नागरिकांनी काढले (Alandi) आहेत.
PMPML : पीएमपीएमएलची पुणे लोणावळा मार्गावर पर्यटन बस सेवा
नागरिकांच्या ते पाणी पिण्या योग्य नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावर्षी एप्रिल महिन्यात वडगांव रस्त्यावर सुद्धा अशुद्ध पाणीपुरवठा झाला होता. तो अशुद्ध पाणीपुरवठा सिध्दबेट जवळील नवीन पुलावर टाकण्यात आलेल्या पाईप लाईन मुळे झाला होता.
बरेच दिवस तेथील काम पूर्ण होऊन त्यास मुख्य पाणी पुरवठ्याची लाईन जोडली नव्हती. त्यामुळे(पाईप लाइन मधील गंजा मुळे) अशुद्ध पाणीपुरवठा झाला (Alandi) असल्याचे त्यावेळेस पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्या द्वारे सांगण्यात आले होते.