Team My pune city – देहूफाटा येथील दाभाडे यांच्या शेतात बिबट्याचा (Leopard) वावर आढळल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याचा वावर आढळल्याने वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले आणि ग्रामस्थांनी यावेळी केली आहे.
PMPML : पीएमपीएमएलची पुणे लोणावळा मार्गावर पर्यटन बस सेवा
देहूफाटा येथील शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछड्यांचे अगदी काही अंतरावरच वावर दिसून आला . बिबट्याने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला आहे. वन विभाग आणि रेसक्यु टीमशी संपर्क केला असता ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले (Leopard)आहेत. त्यांना दाभाडेंच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. तसेच दोन ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.
Digital media : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर
शेतामध्ये जाताना चार ते पाच जणांनी समूहाने जाणे, हातात काठी घेऊन जाणे, एकट्याने शेतात(Leopard) जाऊ नये. तसेच सायंकाळी कामाव्यतिरिक्त जास्त वेळ थांबू नये, घरी येताना समूहाने येणे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सध्याच्या दिवसात शेतात कामांची लगबग सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित ठिकाणी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, भाजपा शहराध्यक्ष भागवत आवटे, वन विभागाचे वनाधिकारी अशोक गायकवाड, लक्ष्मण टिंगरे, रेस्क्यु टीमचे श्रीनाथ चव्हाण, डॅा. सायली पिलाणे, सुभाष दाभाडे आदी ग्रामस्थ उपस्थित (Leopard) होते.


















