Team My Pune City – लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला ( Lokmanya Tilak Award) आहे.
शुक्रवार (दि. 1 ) रोजी लोकमान्य टिळक यांच्या 105 व्या पुण्यतिथीदिनी सकाळी 10 : 30 वाजता टिळक स्मारक मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होईल. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप आहे.
Kalakendra Firing : कलाकेंद्र गोळीबार प्रकरणी चौघा विरोधात गुन्हा दाखल
‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी बुधवारी (दि.23) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. डॉ. रोहित टिळक( Lokmanya Tilak Award) यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल. ‘टिमवि’च्या कुलगुरू व टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. गीताली टिळक, ‘टिमवि ट्रस्ट’च्या आणि ‘टिळक स्मारक ट्रस्ट’च्या विश्वस्त डॉ. प्रणती रोहित टिळक, विश्वस्त रामचंद्र नामजोशी, विश्वस्त सरिता साठे यावेळी उपस्थित असतील. प्रारंभी लोकमान्य टिळक यांचे पणतू, ‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे आधारस्तंभ डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली ( Lokmanya Tilak Award) अर्पण केली जाईल.
Sunil Shelke: रोजगार हमी योजनेला नवे बळ; आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली समितीची सक्रिय बैठक
लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान देऊन गौरविलेल्या आजवरच्या पुरस्कारार्थीच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा इंग्रजी ग्रंथ तयार करण्यात आला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ( Lokmanya Tilak Award) होईल.
रस्ते हे विकासाचे साधन आहे, हे ओळखून नितीन गडकरी यांनी देशभर महामार्गाचे जाळे उभारले. सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या प्रारूपातून त्यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नमामी गंगा प्रकल्पाला त्यांच्याच प्रयत्नांनी लोकचळवळीचे स्वरूप आले. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीसाठी गडकरी कार्यरत आहेत. विविध प्रकारच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांचा गौरव होणार ( Lokmanya Tilak Award) आहे.