“ज्यांनी दिले जीवनावरचे मोलाचे दान, त्यांना आमचा कृतज्ञतेचा सलाम!”.
Team My Pune City – झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC), पुणे तर्फे आज १२वा “नमन दिवस” (ZTCC Pune)अत्यंत भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. हा विशेष दिवस, अवयवदान करणाऱ्या महान आत्म्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी आयोजित केला जातो.
या वर्षी ७० अवयवदात्यांच्या कुटुंबियांना कर्नल भूषण ओक आणि आरजे शोनाली यांनी सन्मानित केले.– जेव्हा दुःखाने काळोख पसरलेला असतो, तेव्हा असा दिलेला निर्णय म्हणजे खरंच दिव्यतेचा झगमगता किरण असतो. आपल्या प्रिय व्यक्तींच्या निधनानंतरही, त्यांनी घेतलेला अवयवदानाचा धाडसी व दयाळू निर्णय अनेक जिवांना नवे आयुष्य देणारा ठरतो.


कार्यक्रमात ZTCC चे सर्व अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, ट्रान्सप्लांट समन्वयक, आणि अनेक अवयवप्राप्त लाभार्थी उपस्थित होते. एकत्र येऊन त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आणि एक सशक्त समाज घडवण्यासाठी एकजुटीचा संदेश दिला.
Ajit Pawar : अजितदादांचं नेतृत्व म्हणजे दिशा, ध्यास आणि दृढनिश्चय – प्रशांत भागवत
CM Devendra Fadnavis : समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’
ZTCC दरवर्षी “नमन दिवस” साजरा करत, समाजात अवयवदानाविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि दात्यांच्या योगदानाचे स्मरण ठेवण्याचा प्रयत्न करते. या दिवशी केवळ स्मरण नव्हे, तर एक नव्या आशेचा दीपही पेटवला जातो – जो जिवंत ठेवतो मानवतेची खरी ओळख.