situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025 : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025

Team My pune city – हुंड्याच्या मागणीसाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून एका विवाहितेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025) उघडकीस आली आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना १७ जुलै रोजी बोऱ्हाडेवस्ती, मोशी येथे घडली.

किरण आशिष धामोदर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संजय हरिभाऊ दोड (५८, जवुळखेड बुद्रुक, ता. अकोट, अकोला) यांनी फिर्याद दिली आहे. आशिष दिपक धामोदर (३२, बोऱ्हाडेवस्ती, मोशी; मूळ गावकावसा, ता. अकोट, जिल्हा अकोला), सुनंदा दिपक धामोदर (५०, गावकावसा, ता. अकोट, जिल्हा अकोला) आणि दिपक तुकाराम धामोदर (६०, गावकावसा, ता. अकोट, जिल्हा अकोला) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती आशिष याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादींची मयत मुलगी किरण धामोदर हिला लग्नात हुंडा दिला नाही म्हणून वेळोवेळी पैशाची मागणी केली. त्यांनी फिर्यादींकडून थोडे थोडे करून एकूण ५ लाख रुपये घेतले. त्यानंतरही पुन्हा आणखी पैशाची आणि मोटारसायकलची मागणी करून तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ आणि धमकी देऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या छळामुळे किरण यांनी आत्महत्या केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


हॉटेल मालकाला पैशाची मागणी करत मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025)

भोसरी एमआयडीसी परिसरातील हॉटेल चालकाला पैशाची मागणी करत मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (२१ जुलै) सकाळी हॉटेल न्यू गारवा, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

या प्रकरणी साहील महमद खान (२६, बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. रोहन अनिल विश्वकर्मा (२१, खंडेवस्ती, एमआयडीसी भोसरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल हॉटेल न्यू गारवा येथे काम करत असताना आरोपी रोहन याने त्यांच्याकडे दरमहा १००० रुपये देण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने आरोपीने हातातील दगडाने फिर्यादीच्या दोन्ही कानाच्या वर डोक्यात मारून जखमी केले. तसेच, शिवीगाळ करत पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


ॲग्रो बिझनेसच्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक ( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025)

वाकड परिसरात ‘वर्ल्ड वाईड ॲग्रो बिझनेस प्रा. लि.’ या नावाने यू ट्यूब चॅनलवरून प्रसिद्धी करून घरबसल्या व्यवसाय आणि मासिक कमाईचे आमिष दाखवून नागरिकांची १८ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली. मे २०२४ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत ही घटना शंकर कलाटे नगर, वाकड येथे घडली.

या प्रकरणी एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुशांत सुभाष पाटील (४०, अष्टे, ता. वाळवा, जि. सांगली), एक महिला आरोपी (३८, अष्टे, ता. वाळवा, जि. सांगली), अभय देवा (४०, अष्टे, ता. वाळवा, जि. सांगली), मनदिपसिंग (३८, काळेवाडी, पुणे) आणि एक महिला आरोपी (३०, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘वर्ल्ड वाईड ॲग्रो बिझ प्रा. लि.’ या नावाने यू ट्यूब चॅनलवर प्रसिद्धी केली. त्यांनी घरबसल्या व्यवसाय आणि मासिक कमाईचे आमिष दाखवून नागरिकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्या आश्वासनांना भुलून फिर्यादी आणि इतर लोकांनी आरोपींकडे १८ लाख सहा हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता आरोपींनी फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Nigdi Robbery Case : निगडी दरोडा प्रकरणातील आरोपी 48 तास उलटल्यानंतरही मोकाट


कुत्रा चावल्याच्या कारणावरून कुटुंबाला मारहाण आणि धमकी ( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025)

दापोडी येथील काटे वस्तीमध्ये कुत्र्या चावल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला मारहाण केली. तसेच वस्तीतून निघून जाण्याची धमकी देण्यात आली. ही घटना ८ जून रोजी काटे वस्ती, दापोडी येथे घडली असून याबाबत २१ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी एका महिलेने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी घरी दैनंदिन कामकाज करत असताना वस्तीत राहणाऱ्या प्रकाश मस्के यांच्या पत्नीने त्यांना बाहेर बोलावले. त्यांच्या पतीने सांभाळलेल्या रस्त्यावरील गावठी कुत्रा चावल्याचे कारण देत फिर्यादीशी भांडण सुरू केले. भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादीची आई आणि बहीण तिथे आल्या. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि वस्तीतून निघून जाण्याची धमकी दिली. त्याच वेळी फिर्यादीची घरमालकीण आरोपी महिला तिथे आली आणि तिनेही कुत्र्यांच्या त्रासामुळे फिर्यादीला शिवीगाळ केली. या वादादरम्यान, फिर्यादीच्या आईने अचानक येऊन काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून जखमी केले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.


पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला ( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025)

राहाटणी येथे जुन्या भांडणातून एका तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (२० जुलै) रात्री राहाटणी येथे घडली.

या प्रकरणी कुंदन राजेंद्र वाघ (३३, नखातेवस्ती, राहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. सौरभ (राहाटणी) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र सचिन रमेश सगर (३५, नखातेवस्ती, राहाटणी) हे कौतिक हॉटेलसमोरून घरी जात असताना, फिर्यादींच्या ओळखीचा आरोपी त्यांच्या पाठीमागून एका साथीदारासह आला. आरोपीला पूर्वी भांडण करताना फिर्यादीने पकडले होते, त्या रागातून त्याने फिर्यादीला थांबवून शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र समजावून सांगत असतानाही आरोपी आणि त्याच्या साथीदाराने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मारहाण करताना आरोपीने त्याच्या पॅन्टच्या खिशातील छोटा चाकू काढून फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर वार करून त्यांना जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.


सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण ( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025)

ताथवडे येथील एका सोसायटीमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना सोमवारी (२१ जुलै) सकाळी कोहीनूर सफायर-२ सोसायटी, ताथवडे येथे घडली.

या प्रकरणी महेश जिजाराम शिंदे (५३, काळेवाडी फाटा, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश श्रीकर मराठे आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोहीनूर सफायर-२ सोसायटीतील आय-विंग क्लब हाऊस येथून राऊंड मारत असताना, डी/२०४ मध्ये राहणारे आरोपी व्यंकटेश आणि त्याची पत्नी फिर्यादीजवळ आले. त्यांनी “रात्री फोनवर तूच होतास ना?” असे म्हणत, आरोपी महिलेने तिच्या हातातील फायबरच्या जाड पाईपने फिर्यादीच्या हातावर, खांद्यावर आणि पाठीवर मारून जखमी केले. तसेच, आरोपी व्यंकटेश याने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Ajit Pawar : अजितदादांचं नेतृत्व म्हणजे दिशा, ध्यास आणि दृढनिश्चय – प्रशांत भागवत


अपघातात मोटरसायकलस्वाराचा मृत्यू ( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025)

मोटरसायकलच्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (२१ जुलै) सकाळी मुंबई – बंगलोर महामार्गावर बिटवाईज कंपनीच्या पुढे, बाणेर येथे घडली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तोसिफ महात यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश तानाजी धांडे (२०, नागसेन नगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या मोटरसायकलस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (एमएच १४/एलसी ८२४८) भरधाव वेगात या अपघातात त्याचा मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करत आहेत.


खंडणीची मागणी करत ट्रान्सपोर्टरला धमकी ( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025)

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला ( Pimpri Chinchwad Crime News 22 July 2025) खंडणीसाठी धमकी दिली. ही घटना रविवारी (२१ जुलै) रात्री आंबेठाण येथील बोरदरा – आंबेठाण रोडवरील हॉरिझोन कंपनीजवळ घडली.

या प्रकरणी किरण सुरेश पडवळ (३२, आंबेठाण, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. निलेश उर्फ जग्गु नवनाथ मांडेकर (३२, आंबेठाण, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश याने फिर्यादी किरण यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसीमधील ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा २ लाख रुपये देण्याची मागणी केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On