Team My Pune City – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणेकर प्रवाशांच्या सोयीसाठी तीन नवीन बसमार्ग ( PMPML) सुरू करण्याची घोषणा केली असून, या नव्या सेवांचा प्रारंभ 22 आणि 25 जुलै 2025 पासून होणार आहे. या निर्णयामुळे शहरातील विविध भागांतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
CM Devendra Fadnavis : समर्पित नेतृत्वाच्या वाढदिनानिमित्त ‘‘सेवाभावी आदर्श’’
1. बसमार्ग क्र. 298– शेवाळेवाडी ते अण्णाभाऊ साठे बसस्थानक (अप्पर डेपो): हा मार्ग हडपसर, रामटेकडी, फातिमानगर, शिंदे छत्री, बिबवेवाडी, लोअर इंदिरानगर अशा महत्त्वाच्या ठिकाणांमधून जात असून, शेवाळेवाडी परिसरातील नागरिकांना अण्णाभाऊ साठे बसस्थानकाकडे थेट प्रवास करता येणार आहे. या मार्गावर एकूण 6 बसेस सोडण्यात येणार असून, दर 30 मिनिटांनी सेवा उपलब्ध असेल. ही सेवा 22 जुलैपासून सुरू होणार ( PMPML) आहे.
2. बसमार्ग क्र. 328 – वाघोली बसस्थानक ते हिंजवडी माण फेज 3: – या मार्गामुळे वाघोली, लोहगाव, धानोरी, भोसरी, इन्फोसिस फेज 1 व 2 गंगारामवाडी सर्कल येथून प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर 4 बसगाड्या धावणार असून, दर तासाला सेवा मिळणार आहे. ही सेवा देखील 22 जुलैपासून सुरू ( PMPML) होईल.
Nutan Kamble : मुख्याध्यापिका नूतन कांबळे-घोलप यांचे निधन
3. बसमार्ग क्र. 10 – जनता वसाहत आपला चौक ते शिवाजीनगर: या मार्गामार्फत जनता वसाहत, गणेश मळा, पान मळा, दांडेकर पूल, स्वारगेट, सारस बाग, शनिपार, पुणे मनपा आणि शिवाजीनगर अशा भागांमध्ये थेट संपर्क साधला जाणार आहे. या मार्गावर सुरुवातीला 1 बस सोडण्यात येणार असून ती दर 1 तास 30 मिनिटांनी धावेल. ही सेवा 25 जुलैपासून सुरू होणार ( PMPML) आहे.