Team My Pune City – दारू पिऊन घरात सतत वाद घालणाऱ्या मुलाचा वडीलांनी गळा दाबून खून केल्याची घटना ( Fursungi Murder) घडली आहे. ही घटना पुण्यातील फुरसुंगी परिसरात घडली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Pune:’त्या’ मंदिरात पुन्हा प्रवेश करण्याची आमची इच्छाच मेली ! पुण्यातील माजी आमदारांनी व्यक्त केली उद्विग्न भावना
प्रशांत सुरेश जमदाडे (वय 35) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर सुरेश बाबुराव जमदाडे (वय 59 रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, हवेली) असे अटक केलेल्या( Fursungi Murder) आरोपी वडीलांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रशांत याला दारूचे व्यसन होते. यावरून सातत्याने घरामध्ये वाद होत होते. नेहमी प्रमाणे प्रशांत हा दारू पिऊन आला आणि आई वडिलांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी मुलगा प्रशांत आणि वडील सुरेश यांच्यामध्ये भांडण ( Fursungi Murder ) झाली.
वडिलांनी प्रशांत ला जमिनीवर खाली पाडून कापडी गमजाने गळा आवळला. त्यानंतर त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपी वडील सुरेश जमदाडे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात ( Fursungi Murder ) आले.