Team My pune city – आज ( दिनांक २१ रोजी ) पहाटे तीनच्या आसपास आळंदी जवळील धानोरे फाटा येथे व्यवसायिक दुकानांमध्ये आग लागली ( Dhanore Fire News) होती. याची माहिती आळंदी पोलीस स्टेशनच्यावतीने अग्निशमन दलाला कळविण्यात आली. तात्काळ आळंदी अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहचल्यानंतर ती आग विझवण्यात सुरूवात केली. परंतु आग प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आषाढी वारीनिमित्त बंदोबस्त कामावर असलेले PMRD चे अग्निशमन दल,आणि PCMC चे चोवीसावाडी अग्निशमन केंद्र यांना पाचारण करण्यात आले .
तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सर्व अग्निशमन दलाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.धानोरे (पीसीएस चौक) येथील दुकान मार्केट हॅाटेल दुकान, स्टेशनरी साहीत्य दुकान, काचेचे दुकान इत्यादी दुकानांना आग मोठ्या प्रमाणात लागलेली ( Dhanore Fire News) होती.
हॅाटेलमधील २ सिलेंडर व एक दुचाकी गाडी बाहेर काढण्यात यश आले. आगीमुळे दुकानांचे खुप नुकसान झाले.
यावेळी आळंदी अग्निशमन दल पथक प्रमुख ( लिडींग फायरमन ) प्रसाद बोराटे, ( Dhanore Fire News) वाहनचालक विनायक सोळंकी, वाहनचालक अजित कुऱ्हाडे,फायरमन अमित घुंडरे,फायरमन सिध्दार्थ गावडे,PMRD चे अग्निशमन दलाचे महेश आव्हाड,फायरमन कृष्णा नागरे,फायरमन ज्ञानेश्वर भोरकृष्णा नागरे,फायरमन ज्ञानेश्वर भोर ,
फायरमन रोहित भिसे,फायरमन सागर जानकर PCMC चे चोवीसावाडी अग्निशमन दलाचे वाहन चालक शाहानवाज सय्यद,फायरमन विष्णु खेडकर,फायरमन संदिप शिरसाट, फायरमन शुभम यादव,फायरमन हर्षद कदम यांच्या विशेष प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.याबाबत माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.यावेळी आळंदी पोलीस व स्थानिक नागरिक उपस्थित ( Dhanore Fire News) होते.