Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा ७५० वा जन्मोत्सव आहे व संत तुकाराम महाराज यांचे ३७५ वे वैकुंठगमन वर्ष हा दुग्ध-शर्करा योग औचित्य साधत काल दि.२० रोजी संत तुकोबाराय यांच्या पालखीचे (Sant Tukaram Palkhi) आळंदीत रात्री पावणे नऊच्या सुमारास आगमन झाले.
फटाक्यांच्या अतिषबाजीत, बँडच्या सुमधुर आवाजात व पुष्पवृष्टीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात आळंदीत शहरात स्वागत करण्यात आले.चाकण चौक मार्गे पालखी मंदिरा कडे मार्गस्थ झाली होती.
Talegaon Dabhade: यंदाचा गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करावा – कन्हैया थोरात
मंदिरात संत तुकाराम महाराजांच्या पालखी (Sant Tukaram Palkhi) दर्शनासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती. काल रात्री पालखी सोहळा आगमना निमित्त चाकण चौक येथे आळंदीतील काही नागरिकांनी फुगडीचा आनंद तिथे लुटला.
आज दि.२१ रोजी सकाळी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा अनुपम सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी कित्येक दिवस भाविक आतुर होते.
Sant Tukaram Palkhi : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आळंदीत पुष्पवृष्टीत स्वागत
बोला पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल…..श्री ज्ञानदेव…..तुकाराम पंढरीनाथ महाराज की …जय या जय घोषात ही अनुपम भेट पार पडली. तदनंतर जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या पालखीचे प्रदक्षिणामार्गे देहुकडे ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात प्रस्थान झाले.

सकाळी साडे सातच्या सुमारास आळंदी नगर पालिका चौकातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहुकडे मार्गस्थ झाला.