Team MyPuneCity – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त यंदा आळंदीत अधिकच भक्तिभावाने वातावरण भारले आहे. या निमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी (Sant Tukaram Palkhi) सोहळ्याचे आज रात्री पावणे नऊच्या सुमारास आळंदी शहरात उत्साही वातावरणात आगमन झाले.
या पालखीचे आळंदी नगरपालिकेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यासाठी आकर्षक फुलांची सजावट करत स्वागत कमान उभारण्यात आली होती. आळंदी देवस्थान, आळंदी नगर परिषद आणि ग्रामस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखीचे (Sant Tukaram Palkhi) पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. शहरातील अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसेच बँडबाजाच्या तालावरही पालखीचे स्वागत करण्यात आले.
Alandi:भक्तिमय वातावरणात माऊलींच्या पालखीचे आळंदीत आगमन
पालखी आगमनाच्या (Sant Tukaram Palkhi) पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती. खांद्यावर भगव्या पताका, हातात टाळ-मृदंग, डोईवर तुळशी वृंदावन आणि ओठांवर “ज्ञानोबा तुकाराम” चा जयघोष करत भाविकांनी भक्तिरसात न्हालेलं वातावरण निर्माण केलं. अशा भक्तिमय गजरात संत तुकाराम महाराजांची पालखी चाकण चौक मार्गे माऊली मंदिराकडे मार्गस्थ झाली.
Talegaon Dabhade: यंदाचा गणेशोत्सव डिजे मुक्त साजरा करावा – कन्हैया थोरात
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा अनुपम भेट सोहळा माऊली मंदिरात पार पडत असून, या विशेष क्षणाची अनेक भाविक आतुरतेने वाट पाहत होते. या दिव्य दर्शनासाठी आणि सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी आळंदीत गर्दी केली होती.