आखाडामुळे मेंढी व बोकड बाजारात मोठी उलाढाल
Team My Pune City –खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Chakan)चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा व बटाट्याच्या आवकेत वाढ झाली. आखाडामुळे मांसाहार खवय्यांची शेळी मेंढी व बोकड बाजारात गर्दी झाली होती. बोकड बाजारात मोठी उलाढाल झाली. १३ हजार ३०० बोकड -शेळ्या- मेंढ्यांची २ हजार ते १५ हजार रुपयांना विक्री झाली. चाकणच्या आठवडे बाजारात गावरान, कडकनाथ व अन्य विविध जातीच्या कोंबड्यांची व गावरान अंड्यांची देखील मोठी खरेदी -विक्री झाली. एकूण उलाढाल ४ कोटी ९० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढली मात्र कांद्याचा कमाल भाव १,६०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक १,५५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५० क्विंटलने वाढून भावात १०० रुपयांची घसरण झाली. बटाट्याचा कमाल भाव २,१०० रुपयांवरून २,००० रुपयांवर स्थिरावला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहिली. लसणाचा कमाल भावही १० हजार रुपयांवर स्थिरावला.
New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
Pune: “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ६ हजार रुपयांपासून ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे
- कांदा – एकूण आवक – १,५०० क्विंटल.भाव क्रमांक – १.१,६०० रुपये, भाव क्रमांक २.१,३०० रुपये, भाव क्रमांक ३.१,००० रुपये.
बटाटा – एकूण आवक – १,५५० क्विंटल.भाव क्रमांक १.२,००० रुपये, भाव क्रमांक २.१,३०० रुपये,भाव क्रमांक ३.१,१०० रुपये.
फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रतीदहा किलोंसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढील प्रमाणे –
टोमॅटो – २९२ क्विंटल (१,५०० ते २,५०० रू.),कोबी – २३० क्विंटल (१,४०० ते १,८०० रू.),फ्लॉवर – २१५ क्विंटल (१,२०० ते १,८०० रु.), वांगी – १०२ क्विंटल (२,००० ते ३,००० रु.), भेंडी – ९२ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), दोडका – ६८ क्विंटल (३,५०० ते ४,५०० रु.), कारली – ७८ क्विंटल ( २,००० ते ४,००० रु.), दुधीभोपळा – ६८ क्विंटल (१,५०० ते २,५०० रु.), काकडी – ९४ ( क्विंटल (१,००० ते २,००० रु.), फरशी – ४० क्विंटल (६,००० ते ८,००० रु.), वालवड – ४३ क्विंटल (५,००० ते ७,००० रुपये), ढोबळी मिरची – १६४ क्विंटल (५,००० ते ६,००० रु.),चवळी – ४६ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), शेवगा – ५५ क्विंटल (३,००० ते ४,००० रु.), गाजर – १४० क्विंटल (१,५०० ते २,००० रु.), गवार – ४६ क्विंटल (७,००० ते १०,००० रु. ), आले – १४५ क्विंटल ( २,००० ते ३,००० रु. ),
पालेभाज्या –
चाकण येथील बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण १७ हजार ५०० जुड्या (६०० ते १,००० रुपये ), कोथिंबीर – एकूण ३० हजार २०० जुड्या (३०० ते ५०० रुपये,), शेपू – एकूण ४ हजार ८५० जुड्या (३०० ते ५०० रुपये ), पालक – एकूण ४ हजार ६०० जुड्या (५०० ते ८०० रुपये),.
जनावरे –