Team My Pune City –दिनांक १८/०७/२०२५ रोजी नेहरुनगर न्यायालयातील (Pimpri Chinchwad)पुरुष वकील कक्षात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन तर्फे वकील बंधू-भगिनींसाठी व त्यांच्या चांगल्या आरोग्याचे सुस्थिती साठी खास आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते सदर आरोग्य शिबिरासाठी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते.यावेळी २७३ वकिलांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
सदर कार्यक्रमात चे अध्यक्ष पद ॲड.कांता गोरडे यांनी तर प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड.गोमती अजित मेहता व ॲड.पूनम स्वामी प्रधान या उपस्थित होत्या. सदर आरोग्य शिबिरासाठी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सुमित सूत्रवे व डॉ. शैलेंद्र मलखेडे उपस्थित होते. तर सदर कार्यक्रम हा ॲड.सविता तोडकर व ॲड.सुप्रिया ज्ञानेश्वर मलशेट्टी यांच्या सहकार्यामुळे पार पडला.
Nigdi: संत निरंकारी मिशनतर्फे रुपीनगर, निगडीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर; ६०० नागरिकांना लाभ
Maval Crime News :शेतात काम करत असताना भावाला मारहाण
यावेळी डॉ.सुमित सूत्रवे यांनी वकिलांना दैनंदिन जीवनात काम करत असताना आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे तसेच वेळोवेळी आरोग्याच्या तपासण्या करणे गरजेचे असल्याचे महत्व पटवून दिले. यावेळी डॉ. सिद्धी कांकरिया यांनी वकिलांच्या डोळ्यांच्या तपासण्या केल्या व वकिलांना डोळ्यांसंदर्भात योग्य ती काळजी कशी घ्यावी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर शिबिराच्या वेळी वकिलांच्या बीपी, शुगर तपासणी व ईसीजी करण्यात आला व डॉक्टरांनी त्यांना आरोग्य संदर्भात काळजी घेताना बीपी व शुगर यावर कसे नियंत्रण मिळवावे तसेच पोषक आहार घेण्यासंदर्भात व व्यायामाचे व चालण्याचे महत्व यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच दैनंदिन जीवनामध्ये जर कोणाला छातीत दुखू लागले तर त्यावेळी प्रथमोपचार म्हणून सीपीआर कसा द्यावा व प्रथमोपचार करण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी माजी अध्यक्ष नारायण रसाळ (नाना ), ॲड.अरुण खरात मामा (अध्यक्ष वकील विकास संघ) ॲड.सुनिल कडुसकर,ॲड. जिजाबा काळभोर, ॲड. राजू माधवन, ॲड.बी के कांबळे, ॲड.किरण पवार, ॲड.शांताराम दामगुडे, ॲड.विजय भगत, ॲड.श्रीकृष्ण ढोरे, ॲड.प्रकाश निनाळे,ॲड.सुदाम साने, ॲड.सुहास पडवळ, ॲड.मदनलाल छाझेड, ॲड.गोरख कुंभार, ॲड.रामचंद्र बोऱ्हाडे,ॲड.तेजस चवरे, ॲड. संतोष मोरे.ॲड. प्रतीक जगताप, ॲड.जयश्री कुटे, ॲड.स्नेहा कांबळे, ॲड.पूनम राऊत, ॲड.पल्लवी कुऱ्हाडे, ॲड.सविता तोडकर,ॲड.पूनम शर्मा, ॲड.किर्ती जैन, ॲड.माधुरी दाते, ॲड.वंदना वाघमारे, ॲड.लीना कुडाळकर, ॲड. मकरंद गोखले, ॲड. उत्तम फाळके,ॲड. शिवाजी कांबळे, ॲड.प्रताप कडूस,ॲड.तुषार खरात,ॲड.केशव घोगरे, व इतर वकील उपस्थित होते.
सदर आरोग्य शिबिराचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.पांडुरंग शिनगारे, उपाध्यक्ष ॲड.अजय यादव,सचिव ॲड.संदीप तापकीर, महिला सचिव ॲड.संगीता कुशलकर, सचिव ॲड. पद्मावती पाटील, ॲड. विशाल पोळ,हिशोब तपासणीस ॲड.प्रेरणा चंदानी, सदस्य ॲड.विजय भोंडे, ॲड.अक्षय चौधरी, ॲड. सुषमा पाटील, ॲड. पौर्णिमा मोहिते, ॲड.आरती कुलकर्णी यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. संदीप भाऊसाहेब तापकीर यांनी केले. तर आभार प्रदर्शन ॲड.प्रेरणा चंदाणी यांनी केले.