situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nigdi: संत निरंकारी मिशनतर्फे रुपीनगर, निगडीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर; ६०० नागरिकांना लाभ

Updated On:


२० वैद्यकीय तज्ञांचे मार्गदर्शन; तपासण्या व औषधे मोफत

Team My Pune City –सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने (Nigdi)संत निरंकारी मिशनच्या सामाजिक उपक्रमांतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे रुपीनगर, निगडी येथील संत निरंकारी सत्संग भवनात भव्य मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन शनिवारी (दि. १९ जुलै) करण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराचा लाभ सुमारे ६०० नागरिकांनी घेतला.

या शिबिरात विविध वैद्यकीय तज्ञांची उपस्थिती लाभली. जनरल फिजिशियन, कान-नाक-घसा तज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, कायरोप्रॅक्टिक, आयुर्वेद, होमिओपॅथी, ऑक्युप्रेशर अशा अनेक शाखांतील तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना सल्ला व उपचार दिला.


Maval Crime News :शेतात काम करत असताना भावाला मारहाण


Pune: पुणे विमानतळावर आपत्कालीन सराव यशस्वी

या शिबिरासाठी १३ जुलै रोजी नागरिकांचे रक्तनमुने तपासण्यासाठी घेण्यात आले होते, तपासणी अहवालांनुसार आवश्यक त्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात ECG सुविधा देखील उपलब्ध होती. डॉ. पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली २० हून अधिक डॉक्टरांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे, तपासण्या अल्पदरात करण्यात आल्या असून औषधे मोफत पुरविण्यात आली. शिबिरासाठी आलेल्या सर्व नागरिकांसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती.

संत निरंकारी मिशनतर्फे मानवसेवेच्या हेतूने देशभर विविध उपक्रम राबवले जातात. स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, नेत्र चिकित्सा शिबिर, महिला सशक्तीकरण, बालविकास व नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य या माध्यमातून मिशन समाजातील सकारात्मक बदल घडवून आणत आहे. भारत सरकार व राज्य सरकारांनीही या कार्याची दखल घेत विविध स्तरांवर सन्मानित केले आहे.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनामध्ये संत निरंकारी सेवादल, स्थानिक ब्रँचचे स्वयंसेवक व मिशनचे अनुयायी यांनी मोलाचे योगदान दिले.

Follow Us On