Team My Pune City –महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व(Pune) पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने “ सतेज संघ,बाणेर यांच्या वतीने “ कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५ व “ बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पुरुष व महिला “ स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात एस.एम. पटेल व चंदुकाका जगताप, सतेज संघ, बाबुराव चांदेर फाऊंडेशन महिला विभागात राजमाता जिजाऊ, शिवशक्ती, महेशदादा स्पोर्टस व कला क्रीडा विकास प्रकल्प हे संघ उपांत्य फेरीत दाखल.
चौथ्या दिवसाच्या पहिल्या उपांत्य पूर्व फेरीच्या अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात नांदेडच्या एस.एम. पटेल संघाने चिपळूणच्या वाघजाई संघावर ३६-३५ असा निसटता विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला एस.एम.पटेल संघ १४-१९ असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर सुग्रीव पुरीन व आर्यन ढवळे यांनी आक्रमक खेळ करीत आपली पिछाडी भरून काढली व आपल्या संघाला एक गुणाने विजय मिळवून दिला. त्यांना वैभव मोरे व प्रतिक बैलमारे याने सुरेख पकडी घेतल्या. वाघजाई संघाचा मध्यंतरानंतर खेळ काहीसा संथ झाला व त्याचा त्यांना फटका बसला व सामना गमवावा लागला. वाघजाई संघाच्या ओंकार कुंभार अभि भोजने यांनी जोरदार प्रतिकार केला. मात्र ते आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. आदित्य राजमर आदित्य शिंदे यांनी पकडी केल्या. दुसऱ्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पुण्याच्या चंदुकाका जगताप प्रतिष्ठान संघाने कोल्हापूरच्या शाहू सडोली संघावर ४३-३७ असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतरला चंदुकाका जगताप संघाकडे २४-१२ अशी आघाडी होती. चंदुकाका जगताप संघाच्या शुभम शेळके व समिर ढोकळे यांनी जोरदार चढाया करीत विजय सोपा केला. चेतन पारगे याने पकडी केल्या. शाहू सडोली संघाच्या तुषार पाटील व विनायक मगदूम यांनी काहीसा प्रतिकार केला. शरद पवार याने पकडी केल्या.
Chinchwadgaon: चिंचवडगावात तुकाराम महाराज व मोरया गोसावी महाराज पालखी दर्शन सोहळा – २० जुलै रोजी भक्तीमय संगम
तिसऱ्या सामन्यात बाणेरच्या सतेज संघाने बालेवाडीच्या प्रकाशतात्या बालवडकर संघावर ४०-३५ अशी मात करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला सतेज संघाकडे २४-१६ अशी आघाडी होती. सतेज संघाच्या पृथ्वीराज शिंदे याने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर सौरभ देशमुख याने पकडी घेतल्या. प्रकाशतात्या बालवडकर प्रतिष्ठानच्या आदित्य शेळके याने एकाकी लढत दिली. तर भाऊसाहेब गोराने यांने पकडी केल्या. चौथ्या सामन्यात बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन संघाने नंदुरबार स्पोर्टस संघावर ३९-३५ विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला बाबुराव चांदेरे फाऊंडेशनकडे २३-२० अशी आघाडी होती. बाबुराव चांदेरे संघाच्या तेजस काळभोर, रोहित कांबळे यांनी जोरदार खेल केला. यश कर्पे याने पकडी केल्या. नंदुरबारच्या ओंकार गाडे व दादासो आव्हाड याने चांगला खेळ केला, श्रेयश उमरदंड याने पकडी केल्या.
New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
मुलींच्या पहिल्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात राजमाता जिजाऊ संघाने डॉ. शिरोडकर संघावर ३६-२५ अशी मात करती उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला राजमाता जिजाऊ संघाकडे २४-६ अशी आघाडी होती. राजमाता जिजाऊ संघाच्या निकिता पडवळ व साक्षी रावडे यांनी चौफेर आक्रमक चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. रेखा सावंत व कोमल आवळे यांनी पकडी केल्या. डॉ. शिरोडकर संघाच्या साक्षी सावंत व मेघा कदम यांनी थोडा फार प्रतिकार केला. वैष्णवी जाधव व साक्षी पवार यांनी पकडी केल्या.


दुसऱ्या सामन्यात शिवशक्ती संघाने प्रकाश तात्या बालवडकर संघावर ५४-३२ असा दणदणीत विजय मिळवून उपांत्या फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला शिवशक्ती संघाकडे ३७-२१ अशी आघाडी होती. शिवशक्ती संघाच्या पूजा यादव व प्रतिक्षा तांडेल यांनी आक्रमक खेळ करीत सहज विजय मिळविला. प्राचि भादवळकर हिने पकडी घेतल्या. प्रकाशतात्या बालवडकर संघाच्या हर्षा शेट्टी व प्रांजल शेटे यांनी काहीशी खेळात रंगत आणली. अंकिता चव्हाण हिने पकडी केल्या.
तिसऱ्या सामन्यात पुण्याच्या महेशदादा स्पोर्टस संघाने उपनगरच्या महात्मा गांधी संघावर ३९-१८ असा दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला महेशदादा स्पोर्टस संघाकडे २०-८ अशी आघाडी होती. महेशदादा स्पोर्टस संघाकडे आर्या पाटील व अर्चना झोरे यांनी जबरदस्त चढाया केल्या. दिव्या गोगावले हिने सुरेख पकडी केल्या. महात्मा गांधी संघाच्या करिना कामतेकर हिने एकाकी लढत दिली. तर प्रतिक्षा सर्वसाने व स्नेहल चिंदरकर यांनी पकडी घेतल्या.
चौथ्या सामन्यात कला क्रीडा विकास प्रकल्प संघाने बारामती स्पोर्टस संघावर २५-२२ असा विजय मिळवित उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला कला क्रीडा विकास प्रकल्प संघ ८-१० असा पिछाडीवर होता. कला क्रीडा विकास प्रकल्प संघाच्या किर्ती कडगंची, रेखा राठोड व मनिषा राठोड यांनी चौफेर हल्ला करीत आपली पिछाडी भरून काढत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सविता गवई हिने पकडी केल्या. बारामती स्पोर्टस संघाच्या एश्वर्य झाडबुके, साक्षी काळे यांनी चांगला खेळ केला. मिनाक्षी बारटक्के व सृष्टी मोरे हिने पकडी केल्या.