ews 18 July 2025
Team My pune city – ऑनलाईन पार्सलच्या नावाखाली एका महिलेची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी (Pimpri Chinchwad Crime News 18 July 2025)ऑनलाईन घडली. याप्रकरणी १७ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महिंद्रा बँक खाते धारक, बँक ऑफ महाराष्ट्र खाते धारक आणि मोबाईल क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला इराणला जाणारे पार्सल आहे, असे सांगून त्यात १५ किलो जनरिक मेडिकल आणि १५ ग्रॅम एम.डी. असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांचा आधार कार्ड क्रमांक मागून स्काय ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर युनिफॉर्ममधील दोन पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. फिर्यादीचे आयसीआयसीआय बँक खाते इतर दोन व्यक्तींशी लिंक असून त्याद्वारे मनी लाँड्रिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले. आय.बी.आय. क्लिअरन्स आणि पोलीस व्हेरिफिकेशनसाठी आयसीआयसीआय बँकेच्या ॲपवर प्रक्रिया करण्यास सांगून त्यांच्या खात्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढून महिंद्रा बँक खाते क्रमांक ०२४५३४७३८० आणि बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्रमांक ६०५१३७२९८०७ या खात्यांवर प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये ऑनलाईन स्वीकारून फसवणूक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पैशाच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला (Pimpri Chinchwad Crime News 18 July 2025)
निगडी येथील म्हाळसाकांत चौकात पैशाच्या कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण करून चाकूने जखमी करण्यात आले. ही घटना १७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
सिद्धेश्वर जयराम मस्के (५६, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक दयानंद बोडके (२२, चिखली) आणि त्याच्या एका मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमूद केलेल्या वेळेत आणि ठिकाणी फिर्यादीचे ओळखीचे आरोपी आणि त्याचा मित्र फिर्यादी काम करत असलेल्या टपरीवर आले. त्यांनी फिर्यादीकडे खर्चासाठी पैसे मागितले. फिर्यादीने विरोध केल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांच्याजवळील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारून जखमी केले. निगडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
जमिनीच्या वादातून तोडफोड आणि चोरी (Pimpri Chinchwad Crime News 18 July 2025)
जमिनीच्या वादातून गाड्यांची तोडफोड करून कागदपत्रे आणि रोख रक्कम चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ३० मे २०२५ रोजी वाकड रोडवरील माऊली चौकात दुपारी घडली.
या प्रकरणी विशाल उर्फ साकी संजय गायकवाड (३७, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश शंकर वाघमारे आणि त्याच्या ५ बॉडीगार्डच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे पाच बॉडीगार्ड फिर्यादीच्या घराजवळ आले आणि त्यांनी फिर्यादीला मोकळ्या जागेत त्यांच्या गाड्या न लावण्यास सांगितले. “ही तुझ्या बापाची जागा नाही, सर्व गाड्या काढून टाक नाहीतर आम्ही तुझ्या सर्व गाड्या फोडून टाकू. तसेच तुझ्या कुटुंबाला या जागेतून घेऊन जा आणि जागा खाली कर नाहीतर तुला मारून टाकू”, अशी धमकी दिली. त्याच दिवशी सायंकाळी आरोपी आणि त्याचे ५ बॉडीगार्ड, ज्यात २ महिला आणि ३ पुरुष होते, त्यांनी फिर्यादीच्या ताब्यात असलेल्या सर्व्हे नं १६९/४ जमिनीमध्ये प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीच्या मालकीच्या टाटा कंपनीच्या वॉटर टँकर (एमएच १२/एफसी ६३१७) आणि अशोक लेलँड कंपनीच्या ट्रक (एमएच १२/केपी १६७७) ची तोडफोड केली आणि टायरची हवा सोडून दिली. तसेच, अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकच्या क्लीनर बाजूच्या दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यातील १४ हजार ५०० रुपये, गाडीची कागदपत्रे, चलनबुक, बिल बुक चोरून नेली. वाकड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक (Pimpri Chinchwad Crime News 18 July 2025)
गांजा बाळगणाऱ्या एका व्यक्तीला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (१७ जुलै) सकाळी भोसरी येथील गावजत्रा मैदानाच्या मागील बाजूस करण्यात आली.
गोविंद गंगाराम घुले (३१, कातवी, मावळ, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनिल जोशी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील गावजत्रा मैदानाच्या मागील बाजूस एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोविंद घुले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९७ हजार रुपये किमतीचा १ किलो ९५४ ग्रॅम वजनाचा गांजा हा आढळून आला. भोसरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गुटखा वाहतुकीप्रकरणी ११ जणांवर गुन्हा (Pimpri Chinchwad Crime News 18 July 2025)
चिखली येथील कुदळवाडी येथे ३१ लाख ४८ हजार ६४४ रुपये किमतीचा गुटखा पकडला. ही कारवाई गुरुवारी (१७ जुलै) सकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाने केली. याप्रकरणी ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी औदुंबर शिंदे (४४, मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उस्मान गणी, बाबर खान, रुस्तम खान, गुलाब खान, मामी चौधरी, साबीक शेख (कोंढवा, पुणे), गणेश गांधी (काळेवाडी), कामरान खान (भवानी पेठ, पुणे), सुजित खिवसरा, निलेश चौगुले (पिंपरी चिंचवड), रफिक कुरेशी (श्रीरामपूर, अहिल्यानगर) या सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील कुदळवाडी येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली. त्यात ३१ लाख ४८ हजार ६४४ रुपये किमतीच्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला. चिखली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.