शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण यांचे नगरपरिषदेला निवेदन
Team My pune city – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा (Palkhi ceremony) याचे औचित्य साधून आषाढी वारीनंतर परतीच्या प्रवासासाठी देहूकडे निघालेला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (दि. २०) आळंदीत येणार आहे.
तसेच याच दिवशी माऊलींचाही पालखी सोहळा आळंदीत येणार आहे. हा ऐतिहासिक क्षण असून भाविक वारकरी हा संत भेट सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतील या पार्श्वभूमीवर, आळंदीत रस्ते स्वच्छ ठेवण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे. देहू फाटा ते आळंदी मार्गावरील रस्त्यांच्या स्वच्छतेबाबत चव्हाण यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्याकडे निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी देहू फाटा परिसरासह पालखी मार्गावरील रस्ते व फूटपाथ त्वरित स्वच्छ करण्याची विनंती केली आहे. सद्यस्थितीत रस्त्यांच्या कडेला साचलेला गाळ, कचरा यामुळे भाविकांना (Palkhi ceremony) अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत स्वच्छतेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.
Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!
“संतांच्या पालख्यांचे आगमन (Palkhi ceremony) म्हणजे आळंदीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पालखी मार्ग स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकारून स्वच्छतेचे आश्वासन दिले आहे.”
— राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, शहरप्रमुख, शिवसेना (आळंदी).