Team My Pune City – शहरात अवैध शस्त्रसाठा ठेवणाऱ्यांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Crime News) तपास पथकाने मोठी कारवाई केली असून एकूण चार पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई दोन विधीसंघर्षित बालक व दोन आरोपींकडून करण्यात आली असून, सुमारे 1 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांच्यासोबतचे कर्मचारी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार विनायक मोहीते, राहुल ओलेकर आणि गणेश झगडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रोड येथील कॉलेजजवळील क्रिकेट ग्राउंडच्या बाजूस एक संशयास्पद इसम पिस्तूल घेऊन थांबलेला आहे.
Robbery : व्यावसायिकाकडील रोकड लुटण्याचा डाव उधळला,तिघांना अटक
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, वरील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता, वर्णनाशी मिळता जुळता एक युवक तेथे उभा दिसून आला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो विधीसंघर्षित बालक असल्याचे स्पष्ट झाले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 40 हजार रुपयांचे एक पिस्टल व 1 हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस आढळून आले.
तपासादरम्यान, सदर बालकाने हे शस्त्र दुसऱ्या विधीसंघर्षित बालकाकडून घेतल्याचे कबूल केले. त्यानुसार दुसऱ्या बालकाचा शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्याने एकूण तीन पिस्टल खरेदी केली होती. एक पिस्टल वरील बालकास, दुसरे स्वतःजवळ आणि तिसरे अनिकेत महादेव सोनवणे (वय 26 रा. सिद्धार्थनगर, तुळजापूर, जि. धाराशिव) याला दिले होते.
Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!
अनिकेत सोनवणे यासही त्याच्या राहत्या पत्त्यावरून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देखील रुपयांचे एक पिस्टल जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Crime News)आर्म्स अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, याच तपासादरम्यान सिंहगड रोड पोलीस ठाणे (Sinhagad Road Crime News)रेकॉर्डवरील फरार आरोपी किरण विठ्ठल शिंदे (वय 23, रा. कृष्णकुंज अपार्टमेंट, जे.एस.पी.एम. कॅम्पस जवळ, वडगाव बु.) यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडूनही एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
जप्त शस्त्रसाठा तपशील:
एकूण पिस्टल: 4 (प्रत्येकी किंमत अंदाजे 40 हजार रुपये)
एकूण जिवंत काडतुसे: 3
एकूण मुद्देमालाची किंमत: 1 लाख 21 हजार रुपये
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, विकास बांदल, देवा चव्हाण, गणेश झगडे, विनायक मोहीते, राहुल ओलेकर, सागर शेडगे, निलेश भोरडे, तानाजी सागर, संदीप कांबळे, समीर माळवदकर व सतिश मोरे यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास सिंहगड रोड पोलीस ठाणे (Sinhagad Road Crime News) करत आहेत.