Team My Pune City – बोपोडी येथील व्ही. बी. पाटील पुलाचे (V. B. Patil Bridge) दुरुस्तीचे काम सुरू असल्याने राजर्षी शाहू महाराज चौक ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) दिशेने जाणारी वाहतूक 16 जुलै ते 27 जुलै या कालावधीत पूर्णतः बंद राहणार आहे.
या दहा दिवसांच्या कालावधीत फक्त एकेरी वाहतुकीस (PCMC कडून राजर्षी शाहू महाराज चौकाकडे) परवानगी देण्यात आली आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेचे मुख्य अभियंता (प्रकल्प) यांनी हा आदेश जारी केला(V. B. Patil Bridge) आहे.
Clean Lonavala : सुपर स्वच्छ लीगमध्ये लोणावळ्याला प्रथम क्रमांक; पाच स्टार मानांकन व ‘वॉटर प्लस’ दर्जा कायम
नागरिकांनी व स्थानिक रहिवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेतली (V. B. Patil Bridge) आहे.