Team My pune city – आळंदी (Alandi) येथील स्वामी समर्थ नगर या ठिकाणी बरेच दिवसांपासून बिबट मादी तिच्या २ पिल्लांसह विशाल थोरवे यांच्या ऊस शेतीमध्ये वास्तव्यास आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची दखल घेत संबंधित विषयावर शोध घेण्यासाठी दि.१४ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक याचे मार्गदर्शना खाली बिबट निवारण केंद्र येथील महेश ढोरे याची टीम आळंदीमध्ये दाखल झाली.
वनाधिकारी यांनी तेथील परिसराची पूर्ण पाहणी केली.बऱ्याच दिवसांपासून बिबट्या त्या परिसरात वास्तव्यास असल्याने स्थानिक नागरिकांचे भीतीबद्दलचे म्हणणे ऐकून घेतले. तेथील स्थानिक नागरिकांना आधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१५ काल रोजी वनरक्षकांद्वारे जागो जागी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले ( Alandi) आहेत .
World Snake Day : जागतिक सर्प दिन: साप संवर्धनासाठी एक पाऊल पुढे
यामुळे बिबट्याची हालचाल कॅमेऱ्यामध्ये कैद होणार आहे. वनरक्षक त्या परिसरात वेळोवेळी गस्त घालत आहेत.त्या परिसरात अधिकारी, वनरक्षक अचल गवळी ,वनरक्षक नवनाथ पगडे स्थानिकांना मार्गदर्शन ,
सूचना करत ( Alandi) आहेत.