Team My pune city – महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. रामराजे जी. भोसले – पाटील यांना पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने ( Pimpri-Chinchwad Advocates Bar Association)मंगळवार, दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सन्मानित करण्यात आले.
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे पदाधिकारी, सचिव ॲड. उमेश खंदारे, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी – दाभाडे, माजी सचिव ॲड. धनंजय कोकणे, ॲड. फारुख शेख, यांनी ॲड. रामराजे भोसले यांच्या कार्यालयात जाऊन हा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
World Snake Day : जागतिक सर्प दिन: साप संवर्धनासाठी एक पाऊल पुढे
त्यावेळी ॲड. शंकर घंगाळे, ॲड. विकास शर्मा, ॲड. आसावरी फडके, ॲड. पूजा बदे, ॲड. अजिंक्य लोमटे यांचीही उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना ॲड. रामराजे भोसले यांनी, ‘सदर पदाला न्याय देणार असून, नोटरी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक ॲड. अतिश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वकील आणि नोटरी यांच्या हिताकरिता कार्यशील राहील!’ अशी ग्वाही दिली व बार असोसिएशनच्या वतीने झालेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त ( Pimpri-Chinchwad Advocates Bar Association) केले.