Team My Pune City – पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधील 16 हरणांचा गेल्या तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. यामध्ये मादी हरणांची संख्या अधिक आहे. हरणांचा मृत्यू नक्की कशाने झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राणी संग्रहालयातील हरणांचा मृत्यू साथीच्या आजारामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, न्याय वैद्यकीय परीक्षण अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल,’ अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे प्रमुख राजकुमार जाधव यांनी दिली. पुणे महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये शंभरहून अधिक हरणे आहेत. गेल्या आठवड्यापासून सलग एक-दोन हरणांचा मृत्यू होत आहे. आतापर्यंत 16 हरणांचा मृत्यू झाला आहे.
Alandi:आळंदी ग्रामीण भागामध्ये बिबट निवारण केंद्र टीमची पाहणी:स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन
Dehugaon: तब्बल १७ वर्षांनंतर तुकोबांची पालखी आळंदी मार्गे देहूत परतणार
‘अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येने हरणे दगावल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनदेखील दक्ष झाले आहे. मृत हरणांचा व्हिसेरा परीक्षणासाठी नागपूर येथील वन्यजीव प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतरच हरणांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तूर्तास उर्वरित हरणांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे,’ अशी माहिती जाधव यांनी दिली.
कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये हरणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापैकी काही हरणे लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. तूर्तास हरणांचे प्रजनन रोखण्यासाठी प्राणी संग्रहालय प्रशासनाने मादी आणि नर हरणांना वेगवेगळ्या पिंजऱ्यांत ठेवले आहे. यापैकी साथीच्या आजारामुळे मादी हरणांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची शक्यता जाधव यांनी व्यक्त केली.