Team My Pune City – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagavane suicide case) तब्बल 58 दिवसांच्या तपासानंतर पुणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सोमवारी (14 जुलै) 11 आरोपींविरुद्ध 1 हजार 670 पानांचे विस्तृत आरोपपत्र पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आलिया बागल यांच्या न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात पोलिसांनी सर्व 11 आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले असल्याची माहिती समोर आली आहे.
GST fraud Racket : ‘जीएसटी’ फसवणूक रॅकेटमधील ‘रेहमानी’वर कारवाईचा दणका!
वैष्णवी हगवणे हिने मे महिन्यात संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या (Vaishnavi Hagavane suicide case) केली होती. तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक पदाधिकारी असल्याने या प्रकरणाला राजकीय व सामाजिक स्तरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणावर लागले असताना पोलिसांनी गुन्हा संवेदनशील असल्याचे कारण देत तपासातील माहिती गुप्त ठेवली होती.
दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेत ‘वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती’ असा दावा न्यायालयात केला होता. त्यांनी वैष्णवीचे एका अनोळखी व्यक्तीसोबतचे चॅट दाखवले होते, ज्यामध्ये तिने आत्महत्येच्या विचारांचा उल्लेख केला असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात हे सर्व दावे फोल ठरवले गेले असून, प्रत्यक्ष छळ, मानसिक त्रास, आणि संबंधित आरोपींकडून झालेला अन्याय याबाबत स्पष्ट आणि ठोस पुरावे मिळाल्याने ही आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात मानसिक छळ, मारहाण, दमदाटी, आणि कुटुंबीयांकडून वैष्णवीवर झालेला अन्याय याबाबत पुराव्यांसह मांडणी केली आहे. सद्यस्थितीत 11 पैकी 6 आरोपी कारागृहात आहेत, तर 5 आरोपी जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये वैष्णवीचे सासरे, सासू, नवरा यांचा समावेश (Vaishnavi Hagavane suicide case) आहे.