Team My pune city – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक सुनील खेडकर ( वय ६४ वर्ष) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, जावई असा( Pune) परिवार आहे.
सुनीलराव खेडकर यांनी पुणे महानगराचे बौद्धिक प्रमुख, पुणे महानगर प्रचार प्रमुख, महाराष्ट्र एज्युकेशन संस्थेचे नियामक मंडळ सदस्य, भारतीय विचार साधनाचे सहकार्यवाह, मुंबई येथील सांताक्रूझ भाग सहकार्यवाह, संभाजी भागाचे बौद्धिक प्रमुख या व अशा विविध जबाबदारी सांभाळल्या. शीख संप्रदायाचा त्यांचा विशेष अभ्यास ( Pune) होता.
Maval : राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मावळ तालुक्यात एकविरा विद्या मंदिराची प्राची गणेश भानुसघरे प्रथम
ते मूळचे मुंबईचे होते पण मागील 30 वर्ष पुण्यात वास्तव्यास होते. ते अभियंता होते. त्यांचा स्वतःचा व्यवसाय होता. विविध संस्थांचे सल्लागार म्हणून ते कार्यरत होते. उत्तम व्याख्याते म्हणून ते परिचित होते.अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे त्यांनी आयोजित केली होती.
Shabdhan Kavyamanch : आई वडिलांमुळे मी घडलो!’ – अरुण बोऱ्हाडे
वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संभाजी भाग संघचालक अनिल व्यास, विनायकराव डंबीर, एमईएसचे माजी अध्यक्ष राजीव सहस्त्रबुद्धे, अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यांना श्रद्धांजली ( Pune) वाहिली.