Team MyPuneCity – तीन चार दिवसां पूर्वी आळंदी येथील आळंदी नगरपरिषदे च्या चाकण चौक जवळील पार्किंग मध्ये अजब प्रकार समोर आला होता. याच्या वृत्त व्हिडिओ चर्चा आळंदी शहरात होताना दिसून येत होती.
पार्किंग मध्ये कोणतीही पावती न देता पार्किंग वसुली होत आहे.पार्किंगची पावतीची मागणी तेथील पार्किंग व्यवस्था कर्मचाऱ्याकडून केली असता त्यांनी त्याची आवश्यकता नाही,यामुळे पैसे देऊन विना पावती पार्किंग केली आहे.असे संबंधित भाविक म्हणत आहे.अशाच प्रकार पुन्हा घडला असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण मल्हार काळे यांनी केले आहे.
Alandi:आळंदीत २४ वर्षीय युवकाकडून गांजासह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..
सोशल मीडियावर व्हिडिओ द्वारे वाहनतळावर कर्मचाऱ्या मार्फत विना पावती शुल्क आकारल्याचे लक्षात आले आहे. या दोन दिवसांत अहवाल द्यायचा आहे.प्राप्त अहवाला नंतर संबंधित कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल.असे मुख्याधिकारी माधव खांडेकर एका वृत्त प्रतिनिधी ला सांगून ते वृत्त प्रसारित झाले आहे.
तसेच यावेळी इंद्रायणी सेवा फाउंडेशन चे विठ्ठल शिंदे म्हणाले वाहन तळातील कर्मचाऱ्यांचे ऑनलाइन पेमेंट चेक करावे.कर्मचारी ऑनलाइन पेमेंट घेत आहेत का? आता असा सवाल ही उपस्थित राहत आहे. याची चौकशी पालिकेने गरजेचे आहे. तसेच तीन चार दिवसा पूर्वी विना पावती शुल्क आकारले या प्रकारा नंतर पुन्हा तोच प्रकार उघडीस आला आहे.यामुळे पालिकेच्या कारवाईचा धाक कर्मचाऱ्यांवर उरला आहे का नाही असा सवाल उपस्थित राहत आहे.
संबधीत बाबीवर पालिका कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.