Team MyPuneCity –श्री संत बाळूमामा यांच्या पालखी रथाचे दि.६ रोजी धानोरे मार्गे आळंदीत आगमन झाले.
आगमना वेळी मरकळ रस्त्यावर अनेक भाविकांनी श्री संत बाळूमामाच्या पादुकांचे दर्शन घेतले. संत बाळूमामाच्या दर्शना वेळी सर्व भाविकांना भंडारा लावण्यात येत होता. आकर्षक अशी फुल सजावट रथावर करण्यात आली होती.श्री संत बाळूमामा असे नाव गुलाबाच्या फुलाद्वारे रथावर काढण्यात आले होते.
Alandi:आळंदीत २४ वर्षीय युवकाकडून गांजासह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..
संत श्री बाळूमामा बग्गा क्रमांक १३ पालखीचा विश्रांतवड जवळील एका जागेत तळ असून तिच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत आहेत. सकाळी व सायंकाळी संत श्री बाळूमामा यांची आरती होत आहे.

अनेक भाविक आरतीस उपस्थित राहत आहेत. आरती नंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप होत आहे.अनेक जण अन्नदान करत आहेत