Team MyPuneCity – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने मारुंजी येथील मोकळ्या मैदानातून एका २३ वर्षीय तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे विनापरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई १२ जुलै रोजी सायंकाळी करण्यात आली.
सचिन मनोज दोडके (वय २३, रा. सीट्रीन हौसिंग सोसायटी ऑफिससमोर, सरकार चौक, मारुंजी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
Alandi:आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार; कीर्तनकार महिला व कुटुंबीयांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
या प्रकरणी पोलीस शिपाई अमर अजिनाथ राणे (क्र. १९७७, गुन्हे शाखा, युनिट ४, पिंपरी-चिंचवड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार ईरंग प्रॉपर्टीजच्या मोकळ्या जागेवर सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास सचिन दोडके हा ५२ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बेकायदेशीररीत्या जवळ बाळगलेला आढळून आला.
Lohagad Fort: लोहगड किल्ल्यावर पुरातत्व विभाग, ग्रामस्थ व शिवप्रेमींचा जल्लोष ..
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह तह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झोल करत आहेत.