Team My Pune City – ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलेला प्रथम कर्ज वाटप, नंतर अवास्तव पैशांची मागणी केली. हे पैसे न दिल्याने तिचे मॉर्फ केलेले फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. ही घटना 11 ते 22 जून दरम्यान महाळुंगे परिसरात घडली.
इसाकी राजन इसाकी मुयु थेवर (वय 29 रा. वाशी, नवी मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत महाळुंगे येथील एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी
Pimpri:ट्रॅव्हल्स बसच्या काचा फोडल्या; चौघे अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ‘Credit Pilot’ नावाचे लोन अॅप पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या परस्पर खात्यावर पाच हजार 400 रुपये जमा करण्यात आले. त्याबदल्यात विविध यूपीआय क्रमांकावर पैसे भरावेत म्हणून दबाव टाकण्यात आला. तसेच आणखी पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न भरल्याने तिचे मॉर्फ केलेले न्यूड फोटो नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. सायबर पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.