Team My Pune City – भीक न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला चाकूने भोसकले. ही घटना आकुर्डी-चिंचवड लिंक रोडवर बुधवारी (दि. 10) दुपारी तीन वाजताच्या (Akurdi Crime News) सुमारास घडली.
Chandani Chowk Accident : दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
शंकर जगताप (रा. अग्रसेन भवनजवळ, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सुजन रमेश मोरे (वय 19 रा. किसन पांढरकर चाळ, आकुर्डी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी (दि.11) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Akurdi Crime News) आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बँकेतून पैसे काढून परत जात असताना एक मुलगी त्यांच्याकडे भीक मागत होती. पैसे नसल्याचे सांगितल्यावर आरोपीने शिवीगाळ करून “तुझे जादा चरबी है, जान से मार देता हूँ” असे बोलून चाकूने त्यांच्या पोटात व कंबरेत भोसकून जखमी केले.निगडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत (Akurdi Crime News) आहेत.