Team My Pune City – भरधाव वेगातील दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून चालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 10) रात्री 10 वाजताच्या सुमारास बावधन येथील चांदणी चौकाजवळ घडली.
Ravet Crime News : फ्लॅट विक्रीच्या नावाखाली निवृत्त शिक्षकाची फसवणूक
अक्षय बजरंग शिंदे (वय 22, रा. धायरी, पुणे) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दुचाकीवरील सहप्रवासी असलेल्या अदित्य श्रीहरी धपाटे (वय 21, पुणे) यांनी शुक्रवारी याबाबत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिय्रादी धपाटे हे आरोपी शिंदे यांच्यासोबत केटीएम (एमएच 12 एसडी 1186) या दुचाकीवरून भुगावहून घरी जात होते. त्यावेळी दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकून दोघेही दोघेही खाली पडले. यात दुचाकीचे नुकसान झाले असून अदित्य धपाटे यांच्या डाव्या हातास, पायास व चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. तर, अक्षय शिंदेच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. बावधन पोलीस याबाबत अधिक तपास करीत ( Chandani Chowk Accident) आहेत.