Team My Pune City – सार्वजनिक रस्त्यालगत पार्क केलेल्या ट्रॅव्हल्सच्या बसच्या काचा लाकडी दांडके व दगडांनी हल्ला फोडण्यात आल्या. ही घटना गुरुवारी (दि. 10) रात्री 11.50 वाजताच्या सुमारास पिंपरीतील साधू वासवानी गार्डनसमोर घडली.
स्वराज गणेश पानकडे (वय 19), आशिष राजेंद्र जाधव (वय 25), शिवराज भाऊसाहेब खोसे (वय 22), सुशांत महादेव शेंडगे (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या आणखी एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घनशाम त्रिलोकनाथ गुप्ता (वय 34, रा. वैभवनगर, पिंपरी) यांनी शुक्रवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Vadgaon BJP : वडगांव मावळमधील बाह्यवळण रस्त्यावर तातडीने भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुल उभारण्याची वडगाव भाजपाची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सार्वजनिक रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दोन बसवर दगडफेक करून काचा फोडल्या. विरोध केला असता फिर्यादी व त्यांचा भाऊ डॉ. विजय यांना मारहाण केली. तसेच परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.